advertisement

Maharashtra Cabinet Devendra Fadnavis : भाजपचं अजितदादांना झुकतं माप! दिल्लीत मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?

Last Updated:

Maharashtra Cabinet Devendra Fadnavis : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या फॉर्म्युलामध्ये भाजपने अजित पवारांना झुकतं माप दिलं असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत बैठकीला गेले नाहीत.

भाजपचं अजितदादांना झुकतं माप! दिल्लीत मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला?
भाजपचं अजितदादांना झुकतं माप! दिल्लीत मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला?
मुंबई :  राज्यातील महायुती सरकारचा सत्ता वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. रात्री उशिरा दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यात खलबतं झाली. या बैठकीत मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या फॉर्म्युलामध्ये भाजपने अजित पवारांना झुकतं माप दिलं असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत बैठकीला गेले नाहीत.

खाते वाटपावरून तिढा...

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. मात्र, महायुती सरकारचा जवळपास 13 दिवसांनी शपथविधी झाला. या शपथविधी सोहळ्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, अजित पवार या तिघांनीच शपथ घेतली. अद्यापही खाते वाटप झाले नाही. तर, दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्ताराकडे महायुतीच्या आमदारांचे लक्ष लागले आहे. खाते वाटपावरून महायुतीमध्ये तिढा सुरू असल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी गृह खात्याची मागणी केली आहे. या मागणीला भाजपने विरोध केला आहे. त्याऐवजी अन्य खाते देण्याची तयारी भाजपने दर्शवली असल्याचे म्हटले जात आहे. तर, अजित पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेने इतक्याच मंत्रिपदाची मागणी केली आहे.
advertisement

भाजपकडून अजितदादांना झुकतं माप?

'टाईम्स ऑफ इंडिया'ने राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, महायुती सरकारमध्ये भाजपला 20 खाती मिळतील. तर, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी 10 खाती मिळतील. महायुतीमध्ये आमदारांची वाढलेली संख्या पाहता मंत्रिमंडळात अडीचृ-अडीच वर्षांचे रोटेशन पद्धत राहण्याची शक्यता आहे. तर, अन्य सूत्रांनुसार, शिवसेनेला 12 मंत्रिपदे मिळू शकतात. तर, अजित पवार गटाला काही महत्त्वाच्या खात्यांसह त्यांचे पक्षाचे आमदार असलेल्या एखाद्या लहान राज्याचे राज्यपालपद मिळू शकते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Cabinet Devendra Fadnavis : भाजपचं अजितदादांना झुकतं माप! दिल्लीत मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?
Next Article
advertisement
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement