advertisement

जिचा चेहरा स्वत:च्या छातीवर कोरला तिनेच उडवली खिल्ली; मराठी अभिनेत्री बॉयफ्रेंडला सायको म्हणाली

Last Updated:

करणच्या या टॅटूवर गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाशनं देखील रिअँक्शन दिली. तेजस्विनीनं करणला सायको म्हटलं आहे. तेजस्वीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

News18
News18
टीव्हीवरील लोकप्रिय जोडी तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा बिग बॉसच्या घरात भेटले. दोघांचं प्रेम झालं आणि ते बाहेर आल्यानंतरही कायम आहे. दोघे लवकरच लग्न करणार आहेत. अलिकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये करण कुंद्राने तेजस्वीच्या चेहऱ्याचा टॅटू छातीवर गोंदवल्याचं दिसलं. हे पाहिल्यानंतर अनेकांना विश्वास बसला नाही. हा एआय-जनरेटेड व्हिडीओ आहे असंही वाटलं. करणच्या या टॅटूवर गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाशनं देखील रिअँक्शन दिली. तेजस्विनीनं करणला सायको म्हटलं आहे.
तेजस्वी प्रकाश नुकतीच लाफ्टर शेफच्या सेटवर स्पॉट झाली. तेव्हा पापाराझींनी तिला करणच्या टॅटूविषयी विचारलं. तिच्याबरोबर भारती सिंह देखील होती. ती भारतीला म्हणाली, तू करणचा टॅटू पाहिला? भारती म्हणाली हो. तर खरा आहे का? त्यावर तेजस्वी म्हणाली, हा तो टॅटू परमनंट आहे. करण सायको आहे. तेजस्वीची ही रिअँक्शन पाहून भारतीसह पापाराझी देखील हसायला लागले.
advertisement
दरम्यान हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना करण कुंद्रानं त्या टॅटूमागचं खरं सीक्रेट सांगितलं.  तो टॅटू परमनंट नाही. हा टॅटू तेजस्वीच्या पहिल्या ओटीटी शो 'सायको सैयान'च्या प्रमोशनसाठी काढण्यात आला होता. करण म्हणाला, "मी माझा सपोर्ट दाखवण्यासाठी हे केलं.  तो शोच्या लाँच इव्हेंटसाठी मी तसा टॅटू काढून पोहोचलो होतो कारण शोमधील कॅरेक्टरमध्येही मुलीच्या चेहऱ्याचा टॅटू  आहे.  मला तिला सपोर्ट द्यावा लागेल. हा शो खूप मनोरंजक आहे आणि प्रमोशनमध्ये सहभागी होणे हा तिला सपोर्ट करण्याचा उत्तम मार्ग आहे."
advertisement












View this post on Instagram























A post shared by India Forums (@indiaforums)



advertisement
तेजस्वी प्रकाश अमेझॉन एमएक्स प्लेअरवर 'सायको सैयान' या चित्रपटातून ओटीटी डेब्यू करत आहे, ज्यामध्ये रवी किशन आणि अनुद सिंग ढाका देखील आहेत. हा एक रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
जिचा चेहरा स्वत:च्या छातीवर कोरला तिनेच उडवली खिल्ली; मराठी अभिनेत्री बॉयफ्रेंडला सायको म्हणाली
Next Article
advertisement
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement