'दादागिरी'! फडणवीसांनी ज्या नेत्याला केला विरोध, अजितदादा त्यांनाच देतायत उमेदवारी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
नवाब मलिक यांना अजित पवार गट राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ते आज मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून नवाब मलिक अर्ज भरणार आहेत.
मुंबई : भाजपने ज्या नेत्याच्या नावाचा विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी विरोध केला. त्याच उमेदवाराला अजितदादा उमेदवारी देण्याचा विचार करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपने साईडलाईन केलेल्या नेत्याला आता अजितदादा उमेदवारी देणार आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा वाद उफळणार का हे पाहावं लागणार आहे.
नवाब मलिक यांना अजित पवार गट राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ते आज मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून नवाब मलिक अर्ज भरणार आहेत. त्यांच्या उमेदवारीबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झालीये. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अणुशक्तीनगर या मलिकांच्या मतदारसंघातून त्यांची मुलगी सना मलिक यांना उमेदवारी दिली आहे.
नवाब मलिक यांच्या नावासाठी भाजपचा विरोध होता. नवाब मलिकांनी याच मतदारसंघाच्या बाजूला असलेल्या मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये जोरदार प्रचार सुरू केलाय. त्यांची अजित पवार गटाबरोबर जवळीक आहे. त्यांची मुलगी याच पक्षात आहे. मात्र नवाब मलिकांना महायुतीतील इतर मित्रपक्षांनी विरोध केला आहे. प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांचा मलिकांना उमेदवारी देण्यासाठी विरोध आहे. त्यामुळे नवाब मलिक हे अपक्ष निवडणूक लढवण्याचीही दाट शक्यता असल्याचीही चर्चा रंगली होती.
advertisement
NCP अजित पवार गटाकडून या वृत्तावर अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. त्यांना अजित पवारांनी उमेदवारी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म मिळाला आहे. मानखुर्द-शिवाजीनगरमधून ते राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म भरणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 29, 2024 11:34 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'दादागिरी'! फडणवीसांनी ज्या नेत्याला केला विरोध, अजितदादा त्यांनाच देतायत उमेदवारी