advertisement

Maharashtra Elections : तावडे-ठाकूरांमध्ये राडा, पैशांचे वाटप झाले? भाजप उमेदवाराने नेमकं सांगितलं

Last Updated:

Maharashtra Elections Vinod Tawade भाजप नेते विनोद तावडे यांच्यासह भाजपचे उमेदवार राजन नाईक हे देखील त्या ठिकाणी होते. या गोंधळाबाबत राजन नाईक यांनी नेमकं काय झालं हे सांगितले.

तावडे-ठाकूरांमध्ये राडा, पैशांचे वाटप झाले? भाजप उमेदवाराने नेमकं सांगितलं
तावडे-ठाकूरांमध्ये राडा, पैशांचे वाटप झाले? भाजप उमेदवाराने नेमकं सांगितलं
विरार, पालघर: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी विरारमध्ये तुफान राडा झाला. विरारमधील एका हॉटेलमध्ये भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे हे हॉटेलमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली. या गोंधळात बविआचे विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर देखील दाखल झाले. त्यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले. भाजप नेते विनोद तावडे यांच्यासह भाजपचे उमेदवार राजन नाईक हे देखील त्या ठिकाणी होते. या गोंधळाबाबत राजन नाईक यांनी नेमकं काय झालं हे सांगितले.
क्षितीज ठाकूरांसह बविआ कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये घूसून विनोद तावडे यांनी घेरलं आहे.तसेच यावेळी एका कार्यकर्त्यांने घटनास्थळावरून बॅग ताब्यात घेऊन ती तपासली त्यामध्ये पैसै भरलेले लिफाफे सापडले. यानंतर एकच गोंधळ उडाला. विनोद तावडे हे कशासाठी आले होते, याची माहिती उमेदवार राजन नाईक यांनी दिली.

राजन नाईक यांनी काय म्हटले?

राजन यांनी सांगितले की, विनोद तावडे हे आज प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक सुरू होती. मतदानासाठी मतदारांना कसे उतरावे, मतदानाच्या दिवशी कशी खबरदारी घ्यावी, कार्यकर्त्यांना मतदानाच्या दिवशी कोणती काळजी घ्यावी या संबंधी मार्गदर्शन विनोद तावडे करत होते. मात्र, त्याच वेळी अचानक बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हे पैसे कोणी आणले, कोणाचे आहेत याची चौकशी करा. मात्र, आमचा आणि पैशांचा संबंध नसल्याचेही राजन नाईक यांनी सांगितले.
advertisement

नेमकं काय झालं?

विरारच्या विवांत हॉटेलमध्ये भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे आले होते. याबातची माहिती नालासोपारा विधानसभेचे उमेदवार क्षितीज ठाकूर यांना मिळताच त्यांनी कार्यकर्त्यांसह हॉटेल गाठले. यावेळी एका कार्यकर्त्यांने घटनास्थळावरून बॅग ताब्यात घेऊन ती तपासली त्यामध्ये पैसै भरलेले लिफाफे सापडले होते. त्यानंतर बविआच्या कार्यकर्त्यांनी हे लिफाफे उघडून पैसे दाखवले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections : तावडे-ठाकूरांमध्ये राडा, पैशांचे वाटप झाले? भाजप उमेदवाराने नेमकं सांगितलं
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement