advertisement

Maharashtra Elections Pune : बंडखोर फेरणार काँग्रेसच्या मेहनतीवर पाणी? पुण्यातील 3 जागा डेंजर झोनमध्ये

Last Updated:

Maharashtra Elections Congress : बंडखोरी होऊन नये म्हणून भाजपचे राज्यातले बडे नेते दारोदारी जात असताना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र आपल्या सरंजामी राजकारणाचा बाज कायम ठेवल्याचे चित्र दिसून आले.

बंडखोर फेरणार काँग्रेसच्या मेहनतीवर पाणी? पुण्यातील तीन जागा डेंजर झोनमध्ये
बंडखोर फेरणार काँग्रेसच्या मेहनतीवर पाणी? पुण्यातील तीन जागा डेंजर झोनमध्ये
वैभव सोनवणे, प्रतिनिधी, पुणे : पुण्यात बंडखोर उमेदवारांमुळे फक्त काँग्रेसच नव्हे तर महाविकास आघाडीदेखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. कसबा आणि शिवाजीनगर या दोन विधानसभा जागांवर थेट काँग्रेस तर पर्वती विधानसभेत महाविकासआघाडीच्या पायावर धोंडा पाडणारी आहे. बंडखोरी होऊन नये म्हणून भाजपचे राज्यातले बडे नेते दारोदारी जात असताना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र आपल्या सरंजामी राजकारणाचा बाज कायम ठेवल्याचे चित्र दिसून आले. मात्र, त्यामुळे पुणे शहरात काँग्रेसच्या 3 जागा धोक्यात आल्यात.
महाविकास आघाडीला यंदा पुण्यात विधानसभेच्या 3 ते 4 जागा मिळतील असं वातावरण लोकसभेनंतर तयार झालं होते. विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यावर उमेदवारीच्या समीकरणात 3 विधानसभेमध्ये काँग्रेसने कँटोंमेंटमधून रमेश बागवे, कसब्यात रविंद्र धंगेकर आणि शिवाजीनगरमधून दत्ता बहिरट असे तगडे उमेदवार दिले. पण काँग्रेसच्या निवृत्तीकडे झुकलेल्या कमल व्यवहारे , आबा बागुल आणि मनिष आनंद या नेत्यांनी ही शेवटची संधी वाटल्याने त्यांनी 3 विधानसभांमध्ये अर्ज दाखल करत बंडखोरी केली. अर्ज माघारीपर्यंत हे अर्ज मागे घेतले जातील असं वाटत असतानाच तिघांनी ही अर्ज कायम ठेवल्याने या मतदारसंघाची गणितच बदलली आहेत.
advertisement
अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत या बंडखोरांसोबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी योग्य ती चर्चा न केल्याने आणि आश्वासन न देता बंडखोरी गांभीर्याने न घेतल्याने महाविकासआघाडीच्या या तिन्ही जागा अडचणीत आल्यात. याउलट भाजपने बंडखोरांना अत्यंत गांभीर्याने घेत स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून त्यांच्या घरी जाऊन आश्वासित करून बंडखोरी थंड केली आणि त्यांना प्रचारात ही सक्रिय केले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नेहमीप्रमाणे दरबारी राजकारण करत आता वेळ गेल्यावर या नेत्यांवर कारवाईची छडी उगारलीय.
advertisement
काँग्रेसच्या या सरंजामी आणि दरबारी राजकारणाचा फटका पुण्यात तीन जागांवर महाविकास आघाडीला बसणार हे निश्चित आहे. हाच पवित्रा काँग्रेसने बदलला नाही तर काँग्रेस पराभूत होईल असं मत राजकीय वर्तुळात व्यक्त केलं जातंय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Pune : बंडखोर फेरणार काँग्रेसच्या मेहनतीवर पाणी? पुण्यातील 3 जागा डेंजर झोनमध्ये
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement