Manoj Jarange Patil : निवडणुकीतून माघार, मग कोणत्या पक्षाला पाठिंबा? जरांगे पाटील म्हणतात..
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Elections Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला. पण कोणाला पाठिबा देणार यावरही त्यांनी भूमिका मांडली.
अंतरवाली सराटी, जालना : मराठा आरक्षणासाठी रान उठवणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज निवडणुकीबाबत महत्त्वाची घोषणा केली. या विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली. रविवारी, कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवणार, याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानंतर आज सकाळी पत्रकार परिषदेत जरांगे पाटील उमेदवारांची यादी जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र, निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा त्यांनी केली अन् सगळ्यांना धक्का दिला.
जरांगे पाटलांनी टाकला नवा डाव?
जरांगे पाटील यांनी म्हटले, मध्यरात्री उशिरापर्यंत यादी आली नव्हती. आमचे 14 उमेदवार आणि इतर समाजाकडून उमेदवारांची यादी जाहीर झाली नाही. मध्यरात्री 3 वाजेपर्यंत चर्चा झाली नाही. त्यांची यादी न आल्याने एकाच जातीवर निवडणूक जिंकणे सोपं नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांनी मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. या समाजासोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला होता. रविवारी जरांगे यांनी आपल्या काही जागा जाहीर केल्या होत्या. त्यानंतर आज उमेदवारांची नावे जाहीर होणार होती. मात्र, मित्रपक्षांनी उमेदवारांची नावे न पाठवल्याने आपण एकाच समाजाच्या मतांवर आणि एकाच समाजाचे प्रतिनिधीत्व म्हणून निवडून जाणे योग्य ठरणार नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.
advertisement
निवडणुकीच्या रिंगणात नाही मग पाठिंबा कोणाला?
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला. राजकारणावर वचक नाही म्हणता पण लाख लाख निवडणूक आणतो मराठा असेही त्यांनी सांगितले. आंदोलन ही प्रक्रिया समाजाच्या न्यायासाठी दिली आहे, ती कायमस्वरुपी सुरू राहणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. कोणत्याही अपक्षाला आम्ही पाठिंबा दिला नाही आणि कोणत्याही राजकीय पक्षाला आम्ही पाठिंबा दिला नसल्याचेही जरांगे पाटील यांनी म्हटले. एका जातीवर निवडणूक लढणं अवघड आहे म्हणून आपण आपले अर्ज काढून घ्या, असे आवाहन जरांगे यांनी उमेदवारांना केले.
advertisement
मनोज जरांगे पाटील यांनी काय म्हटले?
मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, आपलं आंदोलन सुरूच आहे, पुन्हा एकदा निवडणूक संपली की आपलं आंदोलन सुरूच राहणार आहे. एकाच जातीवर हे शक्य नाही. रात्री तीन तास चर्चा झाली. एका जातीवर जिंकणं आपण जिंकू शकत नाही. एकट्याने कसं लढायचं असे जरांगे पाटील यांनी सांगितले. त्यांनी पुढे म्हटले की, याला आणि पाड म्हणायची इच्छा नाही. लोकांना जे करायचं ते करा, कोणालाही पाडा आणि कोणालाही निवडणून आणा असे सूचक वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले. आम्ही मतदारसंघ ठरवले होते. फक्त उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करणे बाकी होते. निवडणुकीतून माघार घेतली नसून याला तुम्ही गनिमी कावा म्हणू शकता असे जरांगे पाटील यांनी म्हटले. मित्रपक्षांनी यादी का दिली नाही ह्या प्रश्नावर मनोज जरांने यांनी उत्तर देणं टाळलं.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
Nov 04, 2024 10:00 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange Patil : निवडणुकीतून माघार, मग कोणत्या पक्षाला पाठिंबा? जरांगे पाटील म्हणतात..










