राष्ट्रवादी, काँग्रेस नेत्यांच्या कारखान्याला कर्जासाठी राज्य सरकार राहणार हमी
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
राज्य सहकारी बॅंकेने दिलेल्या ६३१ कोटीच्या कर्जाला आता राज्य सरकार हमी देणार आहे. कारखान्यांनी कर्ज न फेडल्यास राज्य सरकारला पैसे भरावे लागतात.
वैभव सोनवणे, पुणे, 27 ऑक्टोबर : राज्य सहकारी बँकेकडून साखर कारखान्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जासाठी राज्य सरकार तारण राहणार आहे. यामध्ये अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांचा समावेश आहे. जवळपास ६३१ कोटी रुपयांचे कर्ज बँकेकडून दिले जाणार आहे. याआधी भाजप नेत्यांच्या कारखान्याला देण्यात आलेल्या कर्जासाठी राज्य सरकारने हमी दिली होती. आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांच्याही कारखान्यांना कर्जासाठी राज्य सरकार हमी देणार आहे.
बँकेकडून देण्यात येणाऱ्या कर्जासाठी राज्य सरकार ज्या कारखान्यांसाठी हमी देणार आहे त्यामध्ये कल्याण काळे, अमरसिंह पंडित यांच्यासह काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याही कारखान्याचा समावेश आहे. यावर्षीच्या सुरवातीला कारखान्यांच्या कर्जाला हमी देणार नसल्याच एकनाथ शिंदे यांच्या सरकारने जाहीर केलं होतं.
भाजप नेत्यांच्या कारखान्याला एनसीडीसीने दिलेल्या कर्जाला राज्य सरकारने हमी दिली होती. अजित पवार सत्तेत आल्यानंतर आता राष्ट्रवादी आणि कॅांग्रेस नेत्यांच्या कारखान्याला राज्य सहकारी बॅंकेने दिलेल्या ६३१ कोटीच्या कर्जाला आता राज्य सरकार हमी देणार आहे. कारखान्यांनी कर्ज न फेडल्यास राज्य सरकारला पैसे भरावे लागतात. यापूर्वी ही २०१९ मध्ये कारखान्यांनी थकवलेला कर्जाच्या रकमेचे एक हजार कोटी रूपये भरले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 27, 2023 8:37 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राष्ट्रवादी, काँग्रेस नेत्यांच्या कारखान्याला कर्जासाठी राज्य सरकार राहणार हमी