IAS Transferred: मंत्रिमंडळ बैठकीदिवशीच ७ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, फडणवीसांचा निर्णय
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Maharashtra IAS Transferred: राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच राज्यातील चार बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याची सूत्रे हातात घेतल्यापासून प्रशासकीय वर्तुळात वेगाने खांदेपालट होत आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच राज्यातील सात ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.
राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची परंपरा या आठवड्यात देखील कायम राहिली आहे. फडणवीस यांनी राज्याचे सूत्रे हातात घेतल्यापासून विशेष करून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदिवशी आठ-दहा अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी होतात. या आठवड्यातही सात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय मुख्यमंंत्री फडणवीस यांनी घेतला.
कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली?
१. संजय खंदारे (IAS:RR:१९९६) प्रधान सचिव, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई यांची नियुक्ती प्रधान सचिव (पर्यटन), पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आले आहे.
advertisement
२. परराग जैन नैनुतिया (IAS:RR:१९९६) प्रधान सचिव (माहिती तंत्रज्ञान), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
३. कुणाल कुमार (IAS:RR:१९९९) यांना शिवशाही पुनर्वासन प्रकल्प, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
४. वीरेंद्र सिंह (IAS:RR:२००६) सचिव (२), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सचिव (माहिती तंत्रज्ञान), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
advertisement
५. ई. रावेंदीरन (IAS:RR:2008) मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, नवी मुंबई यांची नियुक्ती सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे.
६. एम.जे. प्रदीप चंद्रन (IAS:RR:2012) अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, पुणे यांना प्रकल्प संचालक बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प, पुणे म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
advertisement
७. पवनीत कौर (IAS:RR:2014) उपमहासंचालक, यशदा, पुणे यांना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, पुणे म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 28, 2025 6:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
IAS Transferred: मंत्रिमंडळ बैठकीदिवशीच ७ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, फडणवीसांचा निर्णय


