Nagar Panchayat Reservation: नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर, या 38 नगर पंचायती ओबीसींसाठी, SC-ST साठी कुठं आरक्षण?

Last Updated:

नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची संपूर्ण यादी समोर आली आहे. या आरक्षण सोडतीकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या होत्या.

News18
News18
राहुल झोरी, प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर करण्यात आली आहे. 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. दरम्यान, नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असणार, यावर स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे ठरत असतात. त्यामुळे आजच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या होत्या. अखेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची संपूर्ण यादी समोर आली आहे.
advertisement
74 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव असेल. तर 38 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी राखीव असेल. तर 7 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी (ST) आणि ओबीसी प्रवर्गासाठी 20 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद राखीव असेल.

कोणत्या नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव?

  1. मोहडी- खुला महिला
  2. बार्शी टाकळी- खुला महिला
  3. वाशी- खुला महिला
  4. म्हाळुंगा श्रीपूर- खुला महिला
  5. नांदगाव खंडेश्वर- खुला महिला
  6. गुहागर- खुला महिला
  7. राळेगाव- खुला महिला
  8. लाखांदूर - खुला महिला
  9. वैराग- खुला महिला
  10. सोयगाव - खुला महिला
  11. महादूला- खुला महिला
  12. अनगर- खुला महिला
  13. कडेगाव- खुला महिला
  14. पेठ- खुला महिला
  15. पाठण- खुला महिला
  16. औंढा नागनाथ- खुला महिला
  17. लाखनी - खुला महिला
  18. रेणापूर- खुला महिला
  19. नातेपुते- खुला महिला
  20. म्हसळा - खुला महिला
  21. सडक अर्जुनी- खुला महिला
  22. दिंडोरी- खुला महिला
  23. जळकोट - खुला महिला
  24. मेढा - खुला महिला
  25. लोणंद- खुला महिला
  26. वाडा- खुला महिला
  27. देवरुख- खुला महिला
  28. लांजा - खुला महिला
  29. सिंदखेडा- खुला महिला
  30. मंडणगड- खुलासा महिला
  31. तिवसा- खुला महिला
  32. वडगाव मावळ- खुला महिला
  33. पारशिवनी- खुला महिला
  34. शहापूर - खुला महिला
  35. देहू- खुला महिला
  36. कुही- खुला महिला
  37. मुक्ताईनगर- खुला महिला
  38. बाभुळगाव- खुला महिला
advertisement

कोणत्या नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव?

  1. पोलादपूर
  2. तलासरी
  3. आष्टी बीड
  4. वढवणी
  5. कळवण
  6. घनसावंगी
  7. सावली
  8. कर्जत अहिल्यानगर
  9. मारेगाव
  10. पाटोदा
  11. खालापूर
  12. मंचर
  13. भामरागड
  14. शिरूर अनंतपाड
  15. माढा
  16. जाफ्राबाद
  17. जिवती
  18. आष्टी(वर्धा)
  19. चाकूर
  20. मानोरा

कोणत्या नगरपंचायतीचे अध्यक्षपद अनुसूचित जातींच्या महिलांसाठी राखीव?

  1. बोधनी रेल्वे
  2. नीलडोह
  3. गोंडपिंपरी
  4. अहेरी
  5. बेसापिंपळा
  6. कोरची
  7. ढाणकी
  8. धानोरा
  9. बहादूरा

नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता (ओबीसी) जागा जाहीर

  1. पारनेर
  2. तळा
  3. घनसावंगी
  4. भामरागड
  5. मंचर
  6. पाटोदा
  7. खानापूर
  8. माढा
  9. पोभुर्णा
  10. माहूर
  11. वाडवणी
  12. पोलादपूर
  13. आटपाडी
  14. खालापूर
  15. मालेगाव जहांगीर
  16. शिरूर अनंतपाळ
  17. पालम
  18. कळवण
  19. मंठा
  20. सावली
  21. कोंढाळी
  22. मानोरा
  23. मारेगाव
  24. माळशिरस
  25. आष्टी(वर्षा)
  26. एटापल्ली
  27. झरी- जामणी
  28. तलासरी
  29. जाफ्राबाद
  30. चाकूर
  31. तीर्थपुरी
  32. कणकवली
  33. शिरूर कासार
  34. आष्टी(बीड)
  35. विक्रमगड
  36. अकोले
  37. जिवती
  38. मोखाडा
  39. कर्जत अहिल्यानगर
  40. सुकाना
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagar Panchayat Reservation: नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर, या 38 नगर पंचायती ओबीसींसाठी, SC-ST साठी कुठं आरक्षण?
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement