सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे बंधुंमध्येच टोकाचा संघर्ष पेटलाय. शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. सत्ताधारी पक्षातील दोन पक्षांमध्येच टोकाचा संघर्ष पाहायला मिळतोय. यावर आता सीएम फडणवीसांनीही भाष्य केलंय. अशा प्रकारची स्थिती निर्माण होणं योग्य नसल्याचं मत सीएम फडणवीसांनी व्यक्त केलं. या सर्व परिस्थितीवर आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठीच्या प्राचाराचा आज शेवटचा दिवस. राज्यभरात नेत्यांच्या सभांचा धडाका. रात्री 10 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार.
अनगर नगरपंचायतीची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश काढले. उज्ज्वला थिटे आणि राजन पाटलांमधील संघर्षामुळे अनगर निवडणूक चर्चेत आली आहे.