ऐ बाबू ये public है ये सब जानती है! मतदारराजाचा घराणेशाहीला सुरुंग, 29 पराभूत उमेदवारांची यादी

Last Updated:

नगरपरिषदांच्या निवडणुकीत बऱ्याच नेत्यांचे नातेवाइक जिंकले पण काहींवर पराभवाची नामुष्की ओढावली. घराणेशाहीबाबत ‘कहीं खुशी और बहुत गम’ अशी स्थिती आहे

News18
News18
मुंबई :  राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतींचे निकाल जाहीर झाले आहे. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपनं जोरदार मुसंडी मारत आपलं वर्चस्व कायम राखलं. मात्र नगरपरिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी घराणेशाही राबवणाऱ्या उमेदवारांची चांगलीच वाताहात केली आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी आपल्याचा कुटुंबात उमेदवारी दिल्याचं समोर आलं होतं. मात्र जनतेनं घराणेशाही नाकारली आहे. नगरपरिषदांच्या निवडणुकीत बऱ्याच नेत्यांचे नातेवाइक जिंकले पण काहींवर पराभवाची नामुष्की ओढावली. घराणेशाहीबाबत ‘कहीं खुशी और बहुत गम’ अशी स्थिती आहे
राज्यात अनेक अशी घराणे आहे की एकाच कुटुंबाकडे आमदारकी आणि खासदारकी अशी दोन्ही पदं आहेत. त्यात आता आणखी आमदार, मंत्री आणि माजी मंत्र्यांच्या पत्नी, मुलगी, आई, भाऊ यांना उमेदवारी दिली. स्थानिक पातळीवर एकाच कुटुंबात उमेदवारीची खैरात वाटण्यात आली होती. मात्र मतदारांनी घराणेशाहीला सुरुंग लावलाय. तब्बल 29 जणांचा पराभव जनतेने केला आहे.
advertisement

जनतेने घरणेशाहीला नाकारलेल्या पराभूत उमेदवारांची यादी

अ.क्र.

मतदार संघ

पराभूत उमेदवार

पक्ष

नातं

1भुसावळरजनी सावकारेभाजपमंत्री संजय सावकारे यांची पत्नी
2पंढरपूरश्यामल शिरसाटभाजपमाजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या पत्नी
3देवळी (वर्धा)शोभा तडसभाजपमाजी खासदार रामदास तडस यांची पत्नी
4अकोटरजिया खतीबआघाडीमाजी आमदार खतीब यांची पत्नी
5बुलढाणाअर्पिता शिंदेभाजपमाजी आमदार विजयराज शिंदे यांच्या पत्नी
6श्रीरामपूरअनुराधा आदिकराष्ट्रवादीवडील गोविंदराव आदिक माजी मंत्री व प्रदेशाध्यक्ष
7चाळीसगावपद्मजा देशमुखस्थानिक आघाडीमाजी आमदार राजीव देशमुख यांच्या पत्नी
8पाचोरासुचेता वाघभाजपआमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी
9अंजनगाव सुर्जीयश लवटेशिवसेना उबाठाआमदार गजानन लवटे यांचा मुलगा
10भंडाराडॉ आश्विनी भोंडेकरशिवसेनाआमदार नरेंद्र भोंडेकर यांची पत्नी
11तुमसरकल्याणी भुरेशिवसेनामाजी आमदार डायगव्हाणे यांची मुलगी
12लोहागजानन सूर्यवंशीभाजपएकाच कुटुंबात 6 उमेदवार
13बदलापूरवामन म्हात्रेशिवसेनाएकाच कुटुंबातील 4 उमेदवार
14यवतमाळप्रियंका मोघेकॉंग्रेसमाजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची सून
15बार्शीनिर्मला बारबोलेशिवसेना उबाठामाजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांची पत्नी
16करमाळासुनीता देवीभाजप
27 वर्ष नगराध्यक्ष राहिलेल्या गिरधर दासदेवी यांची सून
17दर्यापूरनलिनी भारसाकळेभाजपअकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांची पत्नी
18पारोळाअंजली पवारशिवसेना उबाठामाजी नगराध्यक्ष करण पवार यांची पत्नी
19पेठ वडगावप्रणिता सालपेजनसुराज्यमाजी नगराध्यक्ष कुटुंबातील
20आजरा अशोक सराटी(आघाडी) माजी नगराध्यक्ष कुटुंबातीलअशोक सराटीआघाडीमाजी नगराध्यक्ष कुटुंबातील
21पाथरीजुनेदखान दुर्गानीकॉंग्रेसवडील बाबा दुर्गानी माजी आमदार
22वाशिमनितेश मलिकभाजपमाजी आमदार लखन यांचे पुत्र
23वाशिमसीमा राजगुरूभाजपमाजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू यांची पत्नी
24मुर्तीजापुरभूपेंद्र पिंपळेभाजपआमदार हरीश पिंपळे यांचा भाऊ
25रत्नागिरीशिवानी सावंतशिवसेना उबाठामाजी आमदार सुरेंद्र माने यांची सून
26गडहिंग्लजस्वाती कोरेजनता दलमाजी आमदार श्रीपतराव शिंदे यांची मुलगी
27मुरगूडतसनीम जमादारराष्ट्रवादी शरद पवारमाजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांची पत्नी
28संगमनेरसुवर्णा खताळशिवसेना उबाठाआमदार अमोल खताळ यांची वहिनी
29फलटणअनिकेत निंबाळकरराष्ट्रवादी शरद पवारमाजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे भाऊ
advertisement

आगामी महापालिका निवडणुकांसाठी स्पष्ट संकेत

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही तळागाळतल्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे असं म्हंटलं जायचं. लोकसभा असो किंवा विधानसभा, आपल्या नेत्याला निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते दिवसरात्र जंग जंग पछाडून, रक्ताचं पाणी करतात. स्थानिक स्वराज्य संस्थेतून राजकीय प्रवास सुरू होईल एवढी अपेक्षा कार्यकर्त्यांना असते. मात्र कार्यकर्त्यांच्या या आशेवर त्यांचेच नेते पाणी फिरवत असल्याचं बोललं जात होतं. अखेर जनतेने घराणेशाहीला नाकारात आगामी महापालिका निवडणुकांसाठी स्पष्ट संकेत दिले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ऐ बाबू ये public है ये सब जानती है! मतदारराजाचा घराणेशाहीला सुरुंग, 29 पराभूत उमेदवारांची यादी
Next Article
advertisement
Nagar Parishad Election : ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षानं मैदान मारलं
ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा
  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

View All
advertisement