Maharashtra CM Oath Ceremony LIVE: फडणवीसांनी चक्रव्यूह भेदला, काही वेळातच CM पदाची शपथ घेणार
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Maharashtra CM Swearing Ceremony Live News Updates: देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
मुंबई : संपूर्ण राज्यासह देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी भाजप नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर पुन्हा मोहोर उठवत त्यांच्याकडे तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर सायंकाळी पाच वाजता भव्यदिव्य स्वरुपात शपथविधी पार पडणार आहे. या सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, शेकडो साधूमहंत उपस्थिती असतील. राज्यातील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने आझाद मैदानावर दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. लाईव्ह अपडेट्स वाचा...
लाईव्ह टीव्हीही पाहा...महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शपथ सोहळा LIVE Streaming
-एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये एकनाथ शिंदे सहभागी होणार की नाही, याचा सस्पेन्स होता. अखेर गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर आणि चर्चेनंतर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला शिंदे तयार झाले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याबरोबर शिंदे शपथ घेतील.
advertisement
-पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ, हिमंता बिस्वा सरमा मुंबईत दाखल
-देवेंद्र फडणवीस आझाद मैदानात दाखल, शिंदे अजित पवारही काही क्षणांत आझाद मैदानात येणार
-आझाद मैदानात कोण कोण उपस्थित
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्य जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उद्योगपती मुकेश अंबानी, निता अंबानी, अभिनेता शाहरूख खान, रणबीर सिंग, अभिनेत्री माधुरी दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते.
advertisement
-देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार मुख्य मंचावर आसनस्थ
-देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस शपथ घेतो की... असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ गुरुवारी सायंकाळी मुंबईतील आझाद मैदानावर घेतली.राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना शपथ दिली. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पडला.
advertisement
- एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे नेते एकनाथ दे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल सीपी राधाकृष्ण यांनी एकनाथ शिंदे यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
- अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
‘मी अजित आशा अनंतराव पवार ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…’ असे म्हणत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी अजित पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 05, 2024 3:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra CM Oath Ceremony LIVE: फडणवीसांनी चक्रव्यूह भेदला, काही वेळातच CM पदाची शपथ घेणार