धक्कादायक! 'छुट्टी तुळशी उसमे डालिए', पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात चक्क हिंदीत पूजा, नेमकं प्रकरण काय?

Last Updated:

Pandharpur News: पुजेवेळी 30 ते 35 मराठी कुटुंब होते. मात्र फक्त एका कुटुंबासाठी हिंदी भाषेत पूजा करण्यात आली, असा दावा राहुल सातपुते यांनी केला आहे.

News18
News18
सोलापूर: मराठी विरुद्ध हिंदी हा वाद आता पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात पोहचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात चक्क हिंदीतून पूजा करण्यात आल्याचा दावा केला जातोय. आता थेट मंदिरात हिंदीतून पूजा झाल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. दरम्यान या व्हायरल मेसेजवर पंढरपूर मंदिराने स्पष्टीकरण दिले आहे.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हिंदी भाषेतून पूजा करण्यात आल्याचा दावा केला जातोय. पुजेवेळी 30 ते 35 मराठी कुटुंब होते. मात्र फक्त एका कुटुंबासाठी हिंदी भाषेत पूजा करण्यात आली, असा दावा राहुल सातपुते नावाच्या व्यक्तीने एक्स या समाजमाध्यमाद्वारे केला आहे.त्यानंतर या व्हायरल मेसेजवर पंढरपूर मंदिराने दिले असून मंदिरात पुजा करण्यासाठी फक्त संस्कृत आणि मराठी भाषेतून करण्यात आल्याचे सांगितले आहे.
advertisement

विठ्ठल मंदिराने नेमकं काय म्हटलं?

विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांना श्रींच्या विविध प्रकारच्या पुजा उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामध्ये श्रींच्या तुळशीपुजेचा समावेश आहे. सदर पुजा बुकींगसाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून ही पुजा देशभरातील भाविक घरबसल्या बुकींग करून पुजेसाठी येत असतात. या भाविकांना पुजेची माहिती व्हावी व पुजेच्या अनुषंगाने सुचना देण्यासाठी प्राधान्याने मराठी आणि आवश्यक भासल्यास हिंदी भाषेतूनही माहिती देण्यात येतात. मात्र, पुजेचे मंत्र हे मराठी व संस्कृत भाषेतून पठण करण्यात येते. यामध्ये पूजा करण्यासाठी इतर कोणत्याही भाषेचा वापर करण्यात येत नाही.
advertisement
तुळशी पुजेवेळी संत तुकाराम भवन येथे आचमन करून आणि संकल्प करण्यात येतो. त्यानंतर गणपतीचे स्मरण, श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे स्मरण व विष्णूसस्त्रनाम पठण करून पुजा करण्यात येते. यासाठी मराठी व संस्कृत भाषेचा वापर करण्यात येतो. तथापि, पुजे संबंधी माहिती सर्व भाविकांना व्हावी या उद्देशाने प्राधान्याने मराठी व आवश्यकता भासल्यास हिंदी व इतर भाषेतून माहिती देण्यात येते.
advertisement
राहूल सातपुते या भाविकांने केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली असून, संबंधितांना आवश्यक त्या सुचना देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

नेमकी काय आहे तक्रार?

पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती तर्फे तुलसी अर्चन पूजाचे आयोजन होते. माझ्या कुटुंबाने त्यात सहभाग घेतलेला. समितीच्या तुकाराम भुवनात साधारण ३०-३५ कुटुंबं पूजेसाठी जमली होती. समिती तर्फे एक गुरुजी स्टेजवर बसून सर्वांना सूचनांच्या माध्यमातून पूजा घडवत होते. सुरुवातीला सूचना मराठीत दिल्या. तेवढ्यात ह्या ३०-३५ कुटुंबापैकी एक कुटुंब म्हणालं की त्यांना मराठी कळत नाही, म्हणून पूजा हिंदीत घ्यावी. गुरुजी लगेच हसत हसत होकार देऊन संपूर्ण पूजा हिंदीत सुरू केली.
advertisement
मी हात वर केला आणि नम्रपणे सांगितलं – “आपण महाराष्ट्रात आहोत. आमच्या कुटुंबाला हिंदी कळत नाही. महाराष्ट्राची राजभाषा मराठी कळते. त्यामुळे कृपया मराठी भाषेत सूचना द्या.” पण यावर गुरुजी माझ्यावर चिडले आणि माईकवरूनच म्हणाले – “या माणसाचा काय विषय आहे? सिक्युरिटी आणि समितीवाले इकडे या आणि या माणसाशी बोला. त्याशिवाय पुढे पूजा सुरू करता येणार नाही.” अस म्हणून त्यांनी माईक बंद केला. उपस्थितांमध्ये चुळबुळ झाली. माझ्या समर्थनार्थ कदाचित ‘आपल्याला पूजेतून बाहेर काढतील’ या भीतीने एकही मराठी कुटुंब देखील पुढे आल नाही.
advertisement
पंढरपूरमधील तुलसी अर्चन पूजेचा अनुभव-आता महाराष्ट्राच्या आद्य दैवताच्या दरबारात देखील हिंदी सक्ती?
पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती तर्फे तुलसी अर्चन पूजाचे आयोजन होते. माझ्या कुटुंबाने त्यात सहभाग घेतलेला. समितीच्या तुकाराम भुवनात साधारण ३०-३५ कुटुंबं पूजेसाठी जमली…
— राहुल सातपुते |
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धक्कादायक! 'छुट्टी तुळशी उसमे डालिए', पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात चक्क हिंदीत पूजा, नेमकं प्रकरण काय?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement