Maharashtra Politics : अजितदादांनी अचानक ताफा वळवला, माजी मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याची भेट, बंद दाराआड काय चर्चा झाली?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ajit Pawar Meets Bhaskarrao Patil Khatgaonkar : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे सख्खे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे आता राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
Maharashtra Politics : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपवासी झाल्यानंतर नांदेडच्या राजकीय वर्तुळात अनेक नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. अशातच आता दोन वेळा काँग्रेस अन् दोन वेळा भाजपच्या वाटेवर चालणारे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भास्करराव पाटील खतगावकर यांची अचानक भेट घेतली. शुक्रवारी रात्री दहा वाजता अजित पवार मुंबईला रवाना होत होते. मात्र, अचानक अजित पवारांनी ताफा खतगावकरांच्या निवासस्थानाकडे वळवला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
अशोकरावांचे सख्खे मेव्हणे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
भास्करराव पाटील खतगावकर तीन वेळेस आमदार आणि तीन वेळेस खासदार राहिले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे सख्खे मेव्हणे असलेले भास्करराव पाटील खतगावकर आता राष्ट्रवादी दादा गटात प्रवेश करणार आहेत. मी 40 वर्ष काँग्रेसमध्ये राहिलोय. कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मी निर्णय घेणार आहे, असं खतगावकर म्हणाले आहेत. खतगावकर आणि त्यांची सून मीनल खतगावकर राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याने आता चर्चेला उधाण आलं आहे.
advertisement
रात्री दहा वाजता अजितदादांनी ताफा वळवला
शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नांदेड आणि परभणी दौऱ्यावर आले होते. परभणी दौरा आटोपून अजित पवार हे पुण्याला आणि नंतर मुंबईला रवाना होणार होते. रात्री दहा वाजेच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला ताफा खतगावकर यांच्या निवासस्थानी वळवला अन् नांदेडमध्ये एकच चर्चा सुरू झाली. त्यावेळी नवाब मलिक देखील अजितदादा यांच्यासोबत होते.
advertisement
खतगावकरांचा राजकीय प्रवास
दरम्यान, यापूर्वी 2014 साली खतगावकर यांनी काँग्रेस सोडून भाजपा प्रवेश केला होता. नंतर पुन्हा ते काँग्रेसमध्ये आले होते. 2024 साली अशोक चव्हाण त्यांनी काँग्रेस सोडून भाजप प्रवेश केल्यानंतर पुन्हा भास्करराव खतगावकर काँग्रेससोडून भाजपात आले. 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीत खादगावकर यांनी पुन्हा पक्ष बदलला. काँग्रेसमध्ये येऊन त्यांनी मीनल खतगावकर यांना नायगाव मतदारसंघातून काँग्रेसची मिळून दिली. मात्र विधानसभेत मिलन खतगावकर यांचा पराभव झाला. आता पुन्हा भास्करराव पाटील खतगावकर पक्ष बदलणार आहेत.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
March 01, 2025 10:45 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Politics : अजितदादांनी अचानक ताफा वळवला, माजी मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याची भेट, बंद दाराआड काय चर्चा झाली?