Mahavitaran Bharti 2025: तरूणांना महावितरण कंपनीमध्ये विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, दीड लाखांपर्यंत पगार! 'असा' करा अर्ज

Last Updated:

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड ही राज्यातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे. आपल्या संपूर्ण घरापर्यंत वीज पोहोचवणाऱ्या वीज वितरण कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

Mahavitaran Bharti 2025: तरूणांना महावितरण कंपनीमध्ये विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, दीड लाखांपर्यंत पगार! 'असा' करा अर्ज
Mahavitaran Bharti 2025: तरूणांना महावितरण कंपनीमध्ये विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, दीड लाखांपर्यंत पगार! 'असा' करा अर्ज
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड ही राज्यातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे. आपल्या संपूर्ण घरापर्यंत वीज पोहोचवणाऱ्या वीज वितरण कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. महावितरण कंपनीमध्ये पदवीधर तरूणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. ऑनलाईन अर्ज करून पदवीधर तरूण अर्ज करू शकणार आहेत.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जर, तुम्ही इच्छुक उमेदवार असाल तर, अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये 300 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीसाठी महावितरण कंपनी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवून घेत आहे. भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. अनेक वरिष्ठ पदांसाठी ही नोकरभरती होणार असून महावितरण कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर नोकरभरतीसाठी अर्ज जाहीर झाले आहेत. जर तुम्ही सुद्धा इच्छुक उमेदवार असाल, तर जाहिरात पाहून पात्रता आणि निकषाप्रमाणे अर्ज भरू शकता.
advertisement
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (DIST.), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil), उपकार्यकारी अभियंता (DIST.), उपकार्यकारी अभियंता (Civil), वरिष्ठ व्यवस्थापक (F&A), व्यवस्थापक (F&A), उपव्यवस्थापक (F&A) अशा पदांसाठी एकूण 300 जागांसाठी नोकर भरती केली जात आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता (DIST.), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil), वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) आणि व्यवस्थापक (F&A) या पदांसाठी 18 ते 40 वर्षांपर्यंतची वयोमर्यादा आहे. उपकार्यकारी अभियंता (DIST.), उपकार्यकारी अभियंता (Civil) आणि उपव्यवस्थापक (F&A) पदासाठी 18 ते 35 वर्षांपर्यंतची वयोमर्यादा आहे. मागासवर्गीय जातीतील उमेदवारांना 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे, इतरत्र कोणत्याही प्रवर्गाला वयामध्ये सूट दिलेली नाही.
advertisement
शैक्षणिक पात्रता
  • अतिरिक्त कार्यकारी अभियंता (DIST.) पदासाठी Electrical मध्ये B.E किंवा B.Tec पदवीची आवश्यकता आणि 7 वर्षांच्या अनुभवाची गरज
  • अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil) पदासाठी Civil मध्ये B.E किंवा B.Tec पदवीची आवश्यकता आणि 7 वर्षांच्या अनुभवाची गरज
  • उपकार्यकारी अभियंता (DIST.) पदासाठी Electrical मध्ये B.E किंवा B.Tec पदवीची आवश्यकता आणि 3 वर्षांच्या अनुभवाची गरज
  • उपकार्यकारी अभियंता (Civil) पदासाठी Civil मध्ये B.E किंवा B.Tec पदवीची आवश्यकता आणि 3 वर्षांच्या अनुभवाची गरज
  • वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) पदासाठी CMA मध्ये CA किंवा ICWA पदवीची आवश्यकता आणि 7 वर्षांच्या अनुभवाची गरज
  • व्यवस्थापक (F&A) पदासाठी CMA मध्ये CA किंवा ICWA पदवीची आवश्यकता आणि 3 वर्षांच्या अनुभवाची गरज
  • उपव्यवस्थापक (F&A) पदासाठी CMA किंवा Finance मध्ये CA, ICWA, M.Com. किंवा B.Com + MBA पदवीची आवश्यकता आणि 1 वर्षाच्या अनुभवाची गरज
advertisement
पद. क्र. 1 ते 4 च्या अधिकृत जाहिरातीची लिंक - https://drive.google.com/file/d/1IQGOdSiH8FhxnsMASRpx-rfPr8cK9PXz/view
पद. क्र. 5 ते 6 च्या अधिकृत जाहिरातीची लिंक - https://drive.google.com/file/d/1vokW6BO3lLqc5V4xsP_0x4J8XJAhurk6/view
अर्जाची लिंक - https://ibpsonline.ibps.in/msedcljun25/
अधिकृत वेबसाईट - https://www.mahadiscom.in/
advertisement
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 500 रूपये असणार आहे आणि त्यावर पुढे GST लागू केला जाईल, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 250 रूपये असणार आहे आणि त्यावर पुढे GST लागू केला जाईल. 'अपंग' असलेल्या अर्जदाराला अर्ज शुल्कातून सूट मिळाली आहे. एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही. अर्जदारांना अर्ज शुल्क ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून करावे लागणार आहे. निवड प्रक्रिया ही चाचणी किंवा मुलाखतीद्वारे पार पडणार असून, अंतिम निवड गुणवत्ता आणि पात्रतेनुसार केली जाईल. उमेदवारांना अर्ज करताना वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि ओळखपत्र यांची सुसंगत कागदपत्रे अपलोड करावी लागतील. भरती झाल्यानंतर उमेदवाराची महावितरणच्या महाराष्ट्रातील कोणत्याही विभागामध्ये निवड केली जाईल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mahavitaran Bharti 2025: तरूणांना महावितरण कंपनीमध्ये विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, दीड लाखांपर्यंत पगार! 'असा' करा अर्ज
Next Article
advertisement
Gold Price Prediction 2026: ...तर, २०२६ मध्ये सोनं होणार २० टक्क्यांनी स्वस्त! 'या' एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

View All
advertisement