छोटंसं घर, 3 बल्ब-पंखा-टीव्ही-कुलर, बिल 2 लाख 46 हजार, महावितरणचा भोंगळ कारभार

Last Updated:

भंडाऱ्यातील अन्वर रहमान खान यांना महावितरणने स्मार्ट मीटर बसवल्यानंतर 2 लाख 46 हजार 900 रुपयांचे वीज बिल पाठवले, अधिकाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

News18
News18
रवी सपाटे, प्रतिनिधी भंडारा-गोंदिया: महावितरणची वारंवार भोंगळ कामगिरी समोर येत आहे. एकीकडे शेतकऱ्यांना पंपाची अव्वाच्या सव्वा बिल पाठवण्याचे प्रकार थांबत नाहीत तोच भंडाऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भंडाऱ्यातील एका कामगाराला तब्बल 2 लाख रुपयांचं बील आलं आहे.
लाल लजपतराय वार्डात राहणाऱ्या एका कामगाराला महावितरणने एका महिन्याचे तब्बल 2 लाख 46 हजार ९०० रुपयांचे वीज बिल पाठवलं. महिन्याला केवळ पाच हजार रुपये कमावणाऱ्या या कामगाराला एवढ्या मोठ्या रकमेचे बिल आल्याने मोठा धक्का बसला. त्यामुळे महावितरणचा जोर का झटका जास्तच जोरानं या कामगाराला बसला आहे. एवढं बिल कसं आलं आणि एवढे पैसे कुठून आणि कसे भरायचे हा सर्वात मोठा प्रश्न त्याच्यासमोर आहे.
advertisement
अन्वर रहमान खान असं या कामगाराचे नाव असून, त्यांचं घर 200 स्क्वेअर फूट जागेत असून त्यात फक्त तीन छोट्या खोल्या आहेत. त्यांच्या घरात तीन छोटे बल्ब, एक पंखा, एक टीव्ही आणि एक कुलर हीच विद्युत उपकरणं आहेत. काही दिवसांपूर्वी महावितरणने त्यांची पूर्वपरवानगी न घेता त्यांच्या घरातील जुने मीटर काढून त्या ठिकाणी नवीन स्मार्ट मीटर बसवलं . त्यानंतर, ऑगस्ट महिन्याचे हे अवाढव्य बिल त्यांच्या हातात ठेवण्यात आलं.
advertisement
हे बिल पाहून घाबरलेल्या अन्वर रहमान खान यांनी लगेच महावितरणचे कार्यालय गाठले, मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना हे बिल भरावेच लागेल, असं सांगितलं. त्यामुळे खान हे आता मोठ्या संकटात सापडले आहेत. याविषयी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी यावर कोणताही प्रतिसाद दिला नाही.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
छोटंसं घर, 3 बल्ब-पंखा-टीव्ही-कुलर, बिल 2 लाख 46 हजार, महावितरणचा भोंगळ कारभार
Next Article
advertisement
अखेर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची घोषणा, पण..., शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट
अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट
  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

View All
advertisement