मालेगाव महापालिकेत भाजपने उभे केले चार मुस्लिम उमेदवार, कुणाकुणाला संधी?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Malegaon Mahanagar Palika Election: मालेगावात भाजपतर्फे दोन महिलांसह चार मुस्लिम उमेदवारांना संधी देण्यात आली.
बब्बू शेख, प्रतिनिधी, मालेगाव: एकीकडे लोकसभा, विधानसभा सभा असो की इतर निवडणुका ,भाजपाच्या वतीने कुठेही मुस्लिमांना उमेदवारी देण्यात आली नाही. किंबहुना महापालिका निवडणुकीत देखील मुंबई, पुणे, नाशिकसह इतर ठिकाणी मुस्लिम उमेदवार देण्यात आली नाही. मात्र मालेगाव महापालिका निवडणूक याला अपवाद ठरली आहे. येथे भाजपतर्फे दोन महिलांसह चार मुस्लिम उमेदवारांना संधी देण्यात आली.
मालेगाव महापालिकेची शेवटची निवडणूक मे २०१७ मध्ये झाली होती. नियमानुसार मे २०२२ मध्ये पुढील निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, निवडणूक न होता १३ जून २०२२ पासून महापालिकेवर प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली. मालेगावमध्ये २१ प्रभागांतील ८४ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
त्यात प्रभाग 8 ब मधून रजिया अकबर शहा, ड मधून शेख रहीम फारूक प्रभाग 14 क मधून नसरीन अस्लम शेख आणि ड मधून शेख सलीम बाबू यांचा समावेश आहे. जवळपास सर्वच निवडणुकांमध्ये मुस्लिम उमेदवारांना तिकीटापासून एका प्रकारे वंचित ठेवणाऱ्या भाजपने मालेगाव महापालिका निवडणुकीत चार मुस्लिम उमेदवार उभे केल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
advertisement
दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबाबत त्यांचे मत व्यक्त करताना म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ भारतातील प्रत्येक नागरिकांना मिळत असतो. त्यामुळे नागरिकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अत्यंत सकारात्मक मत निर्माण झाले आहे. सर्व भागातून उमेदवारी अर्ज आले आहेत, विविध जाती धर्मातून उमेदवारी अर्ज आले आहेत. भाजप सर्व समाजाला घेऊन चालणारा पक्ष आहे, त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी संधी देता येईल तेथे दिली.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
Jan 04, 2026 6:58 PM IST









