Ruturaj Gaikwad : ऋतुराजचा टीमबाहेर काढताच 24 तासात पलटवार , रोहित-विराटला जमला नाही तो पराक्रम करून दाखवला!

Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या वनडे सीरिजमध्ये शतकी खेळी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमधून टीमबाहेर करण्यात आलं आहे.
1/7
टीममधून डच्चू मिळाल्याच्या 24 तासांमध्येच ऋतुराज गायकवाडने त्याच्या बॅटनेच प्रत्युत्तर दिलं आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऋतुराज गायकवाडने इतिहास घडवला आहे. ऋतुराज या स्पर्धेत सगळ्यात जलद 100 सिक्स मारणारा खेळाडू ठरला आहे.

advertisement
2/7
ऋतुराज हा सध्या महाराष्ट्राचा कर्णधार आहे. ऋतुराज गायकवाडने एलिट ग्रुप सी मॅचमध्ये तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करून 52 बॉलमध्ये 66 रन केले. अर्शिन कुलकर्णीसोबत ऋतुराजने दुसऱ्या विकेटसाठी 108 रनची पार्टनरशीप केली.

3/7
ऋतुराज गायकवाड हा विजय हजारे ट्रॉफीमध्ये 100 पेक्षा जास्त सिक्स मारणारा दुसरा बॅटर बनला आहे. कर्नाटकचा मनिष पांडे विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक सिक्स मारणरा खेळाडू आहे.

4/7
मनिष पांडेने 2008 ते 2023 दरम्यान 108 सिक्स आणि 250 फोरच्या मदतीने 3403 रन केले आहेत. तर केरळचा विकेट कीपर विष्णू विनोद 92 सिक्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर युसूफ पठाणने बडोद्यासाठी 91 सिक्स मारून रिटायरमेंट घेतली.

5/7
ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीच्या या मोसमात महाराष्ट्राकडून एलीट ग्रुप सीमध्ये 5 मॅच खेळल्या आहेत, यात त्याने एक शतक आणि एक अर्धशतकाच्या मदतीने 257 रन केल्या आहेत.

6/7
3 डिसेंबर 2025 ला ऋतुराजने रायपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याचं पहिलं वनडे शतक  झळकावलं होतं, पण तरीही त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियातून डच्चू देण्यात आला.

7/7
श्रेयस अय्यरचं टीम इंडियात कमबॅक झाल्यामुळे ऋतुराजला बाहेर जावं लागलं आहे, पण श्रेयस अय्यरची निवड अटी आणि शर्तींसह झाली आहे, श्रेयस अय्यर फिटनेस टेस्ट पास झाला तरच त्याची टीम इंडियात एन्ट्री होईल, पण त्याला फिटनेस टेस्ट पास करता आली नाही, तर मात्र ऋतुराजची पुन्हा निवड होऊ शकते.

US Attack Venezuela Gold Price: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदाजाने गुंतवणूकदारांची झोप उडणार!
अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदा
  • अमेरिकेने व्हेनेझुएला देशावर हल्ला करत राष्ट्रपती मादुरो यांना अटक केली.

  • व्हेनेझुएला हा देश सर्वाधिक तेल उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक

  • अमेरिकेच्या हल्ल्याचे परिणाम बाजारावरही होणार असल्याचे संकेत

View All
advertisement