'अम्मी, अब्बा मुझे माफ करना', दीड महिन्यापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेने चिठ्ठी लिहित संपवलं आयुष्य, 'उसके पास मेरा...'

Last Updated:

Malegoan married Girl Ends life : अवघ्या दीड महिन्यापूर्वीच तिचा विवाह झाला होता. अहमदपुरा भागात राहणाऱ्या इशरतचा विवाह अवामी नगर भागातील तरुणाशी झाला होता.

Malegoan married Girl Ends life
Malegoan married Girl Ends life
Malegoan Crime news : मालेगावमध्ये एका नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणीने लिहिलेल्या चिठ्ठीत एका संशयिताचे नाव नमूद करून, त्याने व्हिडिओची धमकी दिल्याचा उल्लेख केला आहे. सोमवारी सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली आणि मंगळवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. इशरत जहाँ रिजवान अली असं या नवविवाहितेचे नाव आहे.

आसिफ मुझे व्हिडिओ की...

इशरतने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत, "अम्मी, अब्बा मुझे माफ करना, आसिफ मुझे व्हिडिओ की धमकी दे रहा है" अशी चिठ्ठी लिहून आपल्या आई-वडिलांची माफी मागितली. अवघ्या दीड महिन्यापूर्वीच तिचा विवाह झाला होता. अहमदपुरा भागात राहणाऱ्या इशरतचा विवाह अवामी नगर भागातील तरुणाशी झाला होता. इशरतच्या मृत्यूमुळे तिच्या पतीला मानसिक धक्का बसला असून, त्याच्यावर एका खासगी रुणालयात उपचार सुरू आहेत.
advertisement

राहत्या घरी आत्महत्येचं पाऊल उचललं

माहेरच्या परिसरात राहणारा आसिफ मुसा शेख खान हा तिला मोबाईलवर तसेच प्रत्यक्ष भेटून धमकी देत ब्लॅकमेल करत होता, असं तपासात समोर आलं आहे. सोमवारी दुपारी ती माहेरी आली असताना तिने राहत्या घरी हे आत्महत्येचे पाऊल उचलले. शेजाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. रमजानपुरा पोलिसांनी तिला सामान्य रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पतीने दिलेल्या फिर्यादीवरून आसिफविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement

आसिफ मुसा शेख खान याला अटक

दरम्यान, संशयित आसिफ मुसा शेख खान याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला 12 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेला प्रेम प्रकरणाची किनार आहे का, याचाही तपास सुरू आहे. संशयित आसिफ हा मानसिक त्रास देत होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक एएम माळी यांनी सांगितले की, पुढील चौकशी सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'अम्मी, अब्बा मुझे माफ करना', दीड महिन्यापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेने चिठ्ठी लिहित संपवलं आयुष्य, 'उसके पास मेरा...'
Next Article
advertisement
Dharashiv News : कला केंद्रातील नर्तकीवर जीव जडला, प्रियकरानं स्वत:ला का संपवलं? समोर आलं शॉकिंग कारण
कला केंद्रातील नर्तकीवर जीव जडला, प्रियकरानं स्वत:ला का संपवलं? समोर आलं शॉकिंग
  • कला केंद्रातील नर्तकीवर जीव जडला, प्रियकरानं स्वत:ला का संपवलं? समोर आलं शॉकिंग

  • कला केंद्रातील नर्तकीवर जीव जडला, प्रियकरानं स्वत:ला का संपवलं? समोर आलं शॉकिंग

  • कला केंद्रातील नर्तकीवर जीव जडला, प्रियकरानं स्वत:ला का संपवलं? समोर आलं शॉकिंग

View All
advertisement