संतापजनक! छ.संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या पाटीजवळ तरुणाने केली लघुशंका, VIDEO व्हायरल
- Published by:Sachin S
- Reported by:SIDHARTH GODAM
Last Updated:
काही जणांनी या तरुणाला लघुशंका करायला लावली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर:  छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर एक संतापजनक प्रकार घडला आहे.  छत्रपती संभाजीनगर शहराचं नामकरण झाल्यानंतर तब्बल ३ वर्षांनंतर रेल्वे स्थानकावर छत्रपती संभाजीनगर स्थानक अशी पाटी लावण्यात आली आहे. पण, दुसऱ्याच आठवड्यात या पाटीजवळ अज्ञात इसमाने लघुशंका केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यातच औरंगाबाद रेल्वे स्थानक ही पाटी हटवण्यात आली आहे. आता या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर अशी पाटी लावण्यात आली आहे. रेल्वे स्थानकावर ही पाटी लावण्यात आल्यानंतर वादही निर्माण झाला होता. पण, आता छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या पाटीजवळ एका इसमाने लघुशंका केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक येथील नवे नाव असलेल्या पाटीजवळ या माथेफिरू तरुणा लघुशंका केली. या ठिकाणी असलेल्या काही प्रवाशांनी या माथेफिरू तरुणाला लघुशंका करणाऱ्यास रोखलं होतं. तर काही जणांनी या तरुणाला लघुशंका करायला लावली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर लघुशंका करणारा तरुण कोण आहे, तो कुठून आला होता, याची अद्याप माहिती मिळू शकली नाही. पण, घडलेल्या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 31, 2025 5:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संतापजनक! छ.संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या पाटीजवळ तरुणाने केली लघुशंका, VIDEO व्हायरल


