हत्येनंतर मोबाईल बंद, अंडरग्राऊंड झाले, टीप मिळताच पोलिसांकडून मंगेश काळोखेंच्या मारेकऱ्यांचा खेळ खल्लास, 9 जणांना बेड्या

Last Updated:

रायगड जिल्ह्याच्या खोपोलीत माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या झालेल्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

News18
News18
संतोष दळवी, प्रतिनिधी खोपोली: रायगड जिल्ह्याच्या खोपोलीत माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या झालेल्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. आता या हत्याकांडाचा तपास करत रायगड पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्या एकूण ९ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

नेमकी घटना काय?

खोपोली नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या झाल्यानंतर परिसरात प्रचंड जनक्षोभ उसळला होता. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले होते. मंगेश काळोखे यांचे पुतणे राज निलेश काळोखे यांनी खोपोली पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली.
advertisement

पोलिसांसमोर होते मोठे आव्हान

हत्या केल्यानंतर आरोपींनी आपले मोबाईल फोन बंद केले होते, ज्यामुळे त्यांचा शोध घेणे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान ठरले होते. आरोपी मुंबईच्या दिशेने आणि इतर विविध ठिकाणी पळून गेले आणि अंडर ग्राऊंड झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं होतं. मात्र, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा मागोवा घेतला आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या.
advertisement
आरोपींना पकडण्यासाठी रायगड पोलिसांनी विशेष नियोजन केलं होतं. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी एकूण पाच पथकं तयार केली होती. यामध्ये खोपोली पोलीस पथक, खालापूर पोलीस पथक, रसायनी पोलीस पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB आणि नेरळ पोलीस पथकाचा समावेश होता. या पाचही पथकांनी विविध ठिकाणी छापे टाकून अखेर ९ आरोपींना ताब्यात घेतले. फिर्यादीत नाव असलेल्या आरोपींव्यतिरिक्त, त्यांना पळून जाण्यास आणि लपण्यास मदत करणाऱ्या इतर साथीदारांनाही पोलिसांनी निष्पन्न करून अटक केली आहे.
advertisement

मंगेश काळोखे हत्या प्रकरणात कुणाला अटक झाली?

रवींद्र परशुराम देवकर, दर्शन रवींद्र देवकर, धनेश रवींद्र देवकर, उर्मिला रवींद्र देवकर, विशाल सुभाष देशमुख, महेश शिवाजी धायतडक, सागर राजू मोरे, सचिन दयानंद खराडे आणि दिलीप हरिभाऊ पवार असं अटक केलेल्या नऊ आरोपींची नावं आहेत. मुख्य आरोपींसह त्याला मदत करणाऱ्या आरोपींना अटक केल्याने आता या प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. मंगेश काळोखे यांना का मारलं? या प्रश्नाचं उत्तर देखील लवकरच मिळू शकतं. पोलीस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हत्येनंतर मोबाईल बंद, अंडरग्राऊंड झाले, टीप मिळताच पोलिसांकडून मंगेश काळोखेंच्या मारेकऱ्यांचा खेळ खल्लास, 9 जणांना बेड्या
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement