Kokate Arrest Warrant: कोकाटेंचं अटक वॉरंट जारी, फडणवीस नाराज तर अजित पवार म्हणाले...
- Published by:Prachi Amale
Last Updated:
नाशिक कोर्टानं जारी केलंय अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
मुंबई : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. मणिकराव कोकाटेंची अटक निश्चित मानली जात असून सध्या कोकाटे आता मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यानंतर नाशिक कोर्टानं जारी केलंय अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
नाशिक उच्च न्यायालयाने मंगळवारी सदनिका घोटाळाप्रकरणात माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. यानंतर सदनिका घोटाळाप्रकरणातील याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांनी माणिकराव कोकाटे यांनी माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. दोन दिवस अटकेत राहिल्यानंतर राजीनामा देण बंधनकारक आहे.
advertisement
दोन्ही महायुती मित्र पक्ष आग्रही
माणिकराव कोकाटे यांना हाय कोर्ट कडून दिलासा मिळाला नाही तर कोकाटे यांचा राजीनामा निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोकाटे यांना अटक वॉरंट निघाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कोकाटे राजीनामा यावर दोन्ही महायुती मित्र पक्ष आग्रही असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
advertisement
कोकाटे यांचा राजीनामा निश्चित
माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टा कडून दिलासा मिळाला नाही तर कोकाटे यांचा राजीनामा निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोकाटे यांना अटक वॉरंट निघाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कोकाटे राजीनामा यावर दोन्ही महायुती मित्र पक्ष आग्रही असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता आहे.
advertisement
नाशिक पोलिस आयुक्तालयात खलबत सुरू
कोकाटेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिस आयुक्त मुंबई पोलिसांची मदत घेणार का नाशिक पोलिस मुंबईत येणार असल्याची शक्यता आहे. यावर नाशिक पोलिस आयुक्तालयात खलबत सुरू आहे. कोर्टाची ऑर्डर हाती आली की,लागलीच निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान,मुंबई उच्च न्यायालयात कोकाटेंच्या वतीनं याचिका दाखल केली आहे. यावर दुपारी तीन वाजता सुनावणी होण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2025 3:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kokate Arrest Warrant: कोकाटेंचं अटक वॉरंट जारी, फडणवीस नाराज तर अजित पवार म्हणाले...










