Manoj Jarange Patil : पंकजा मुंडेंची अंतरवालीत येण्याची तयारी, जरांगे म्हणतात आम्ही खूनशी नाही!
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Manoj Jarange Patil On Pankaja Munde : पालक मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रजासत्ताक दिनी आपण अंतरवाली सराटीत जाण्यास तयार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर आज मनोज जरांगे यांनी भाष्य केले.
सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी, जालना : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. अंतरवाली सराटीमधील उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. पालक मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रजासत्ताक दिनी आपण अंतरवाली सराटीत जाण्यास तयार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर आज मनोज जरांगे यांनी भाष्य करत आम्ही खूनशी, जातीयवादी नसल्याचे म्हटले.
जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण केल्यानंतर पंकजा मुंडेंनी पालकमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणावर देखील पंकजा मुंडेंनी भाष्य केले होते. मनोज जरांगे पाटलांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास आंदोलनस्थळी जाऊन भेट घेऊ आणि त्यांच्याशी चर्चा करू अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली होती. मनोज जरांगे आपल्या मागण्यांसाठी कायदेशीर लढा देत आहेत. त्यासाठी त्यांनी आमरण उपोषण सुरु केलंय. त्यांच्या लढ्याला यश यावं असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.
advertisement
मनोज जरांगे यांनी काय म्हटले?
मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही खुनशी नाही आमची कुणाला ना नाही.आम्ही काय दहशतवादी आहे का आम्ही जातीयवादी नाही.आम्ही लोकांवर डुक धरत नाही आमची कुणाला ना नाही सगळं देश इथे येऊन गेला असल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
समाजाला शत्रू कोण आहे हे समजलं पाहिजे...
advertisement
मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या उपोषण आंदोलनात सरकारसमोर 10 मागण्या केल्या आहेत. आम्ही उपोषणावर असून सरकारने संपर्क करण्याची आवश्यकता नाही.त्यांची गरज नाही. समाजाला शत्रू कोण हे कळणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. आमच्या आंदोलनात अशोक चव्हाणांनी मध्यस्थी करावी की आणखी कोणी करावी, यासाठी आमची ना नाही. पण, आमच्या लेकरांना न्याय मिळावा ही आमची मागणी असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
advertisement
तरुणांना उपोषण सोडण्याची विनंती करणार...
मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, मी सामूहिक उपोषणाला बसलेल्या तरुणांना उपोषण सोडायला सांगणार आहे. मराठा तरुणांची शरीर उपोषणामुळे खराब व्हायला नको. माझ्या शरीराचं वाटोळं झालेलं आहे, पण तरुणांचं शरीर खराब होता कामा नये. त्यामुळे आज मी सामूहिक उपोषणाला बसलेल्यांना उपोषण सोडण्याची विनंती करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
Location :
Jalna,Jalna,Maharashtra
First Published :
Jan 27, 2025 1:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange Patil : पंकजा मुंडेंची अंतरवालीत येण्याची तयारी, जरांगे म्हणतात आम्ही खूनशी नाही!








