Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी पूर्ण करावे लागणार हे निकष

Last Updated:

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी सर्व निकष पूर्ण करावे लागणार आहेत.

(मनोज जरांगे पाटील)
(मनोज जरांगे पाटील)
चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
पुणे, 26 डिसेंबर : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. आरक्षण मिळालं नाही तर मोर्चा घेऊन मुंबईत येऊ, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे, पण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी सर्व निकष पूर्ण करावे लागणार आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक निकषांची यादी न्यूज18 लोकमतच्या हाती लागली आहे.
advertisement
सामाजिक निकष
- जाती/पारंपारिक व्यवसाय/कारागिरी हस्तकला रोजगार या कारणास्तव अशा वर्गाला सामाजिक स्तरात सामान्यतः कनिष्ठ मानले जाते.
- असा वर्ग ज्यामध्ये राज्याच्या सरासरीच्या 5 टक्क्यांपेक्षा जास्त स्त्रिया निर्वाहाकरीता व्यवसाय/रोजगार/मजुरीमध्ये हलक्या कामात गुंतलेली असतात.
- असा वर्ग ज्यामध्ये राज्याच्या सरासरीच्या 5 टक्क्यांहून अधिक पुरुष निर्वाहाकरीता व्यवसाय/रोजगार/मजुरीमध्ये हलक्या कामात गुंतलेली आहेत.
- असा वर्ग ज्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनुकूल सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण नाही.
advertisement
- असा वर्ग ज्यामध्ये राज्याच्या सरासरीच्या किमान 5 टक्के जास्त पुरुष आणि 10 टक्के पेक्षा जास्त स्त्रिया विवाहाच्या पात्र वयापेक्षा कमी वयात विवाह केला आहे.
- असा वर्ग ज्यात अंधश्रद्धाळू प्रथा व आणि अंधविश्वास सर्रास आहे.
- असा वर्ग ज्यामध्ये स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या चालीरीती सामान्य आहेत.
शैक्षणिक निकष
- असा वर्ग ज्यामध्ये शाळेत शिकणारे विद्यार्थी (इयत्ता पहिली ते दहावी) राज्याच्या सरासरीच्या 10 टक्क्यांपेक्षा कमी आहेत.
advertisement
- असा वर्ग ज्यामध्ये मुलींचे गळतीचे प्रमाण (इयत्ता पहिली ते दहावीत शिकणाऱ्या) राज्याच्या सरासरीच्या किमान 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
- असा वर्ग ज्यामध्ये एसएससी (दहावी इयत्ता) परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी राज्याच्या सरासरीच्या किमान 20 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
- असा वर्ग ज्यामध्ये एचएससी ( बारावी इयत्ता) परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी राज्य सरासरीच्या किमान 20 टक्क्यांपेक्षा कमी आहेत.
advertisement
- असा वर्ग ज्यामध्ये सामान्य पदवी / पदव्युत्तर किंवा तत्सम अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ही राज्याच्या सरासरीच्या किमान 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
- असा वर्ग ज्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम (विधी , वैद्यकीय, अभियांत्रिकी तंत्रज्ञानतांत्रज्ञान, चार्टर्ड अकाउंटन्सी अकाउांटन्सी, मॅनेजमेंट इ )/ डॉक्टरेट पदवी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ही राज्याच्या सरासरीच्या किमान 20 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
advertisement
आर्थिक निकष
- असा वर्ग ज्यामध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची संख्या राज्याच्या सरासरीपेक्षा 25 टक्के जास्त आहे आहे.
- असा वर्ग ज्यामध्ये किमान 30 टक्के कुटुंबे कच्च्या घरामध्ये राहतात (कच्चे घर म्हणजे ग्रामपंचायत कायद्यांतर्गत कराच्या उद्देशाने कच्चे घर म्हणून वर्गीकृत केलेले घर)
- असा वर्ग ज्यामध्ये अल्पभूधारक कुटुंबांची संख्या राज्य सरासरीच्या किमान 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
advertisement
- असा वर्ग ज्यामध्ये भूमिहीन कुटुंबांची संख्या राज्याच्या सरासरीच्या किमान 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
- असा वर्ग ज्यांचे सभासद किंवा संस्थाच्या मालकीच्या कोणत्याही शैक्षणिक संस्था, औद्योगिक प्रतिष्ठान किंवा रोजगाराचे इतर स्त्रोत नाहीत नाहीत.
- असा वर्ग ज्यामध्ये उपभोग कर्ज घेतलेल्या कुटुंबांची संख्या राज्याच्या सरासरीपेक्षा किमान 25% जास्त आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी पूर्ण करावे लागणार हे निकष
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement