Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांची सगळ्यात मोठी ऑफर, छगन भुजबळ मान्य करणार?
- Published by:Shreyas
Last Updated:
आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाज आक्रमक झालेला असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ यांना मोठी ऑफर दिली आहे.
मुंबई : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाज आक्रमक झालेला असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ यांना मोठी ऑफर दिली आहे. ओबीसी नेत्यांनी राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली. या घोषणेआधी त्यांनी छगन भुजबळ यांचा सल्ला घेतला. ओबीसी पक्ष काढत आहेत ही फार चांगली गोष्ट आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
छगन भुजबळांनी या ओबीसी संघटनेचं नेतृत्व करावं, असा आमचा त्यांना सल्ला आहे. पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी त्यांना सामाजिक, राजकीय मदत करायला तयार आहोत. वंचित बहुजन आघाडीचा सल्ला छगन भुजबळ मान्य करतील, अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.
छगन भुजबळ यांना आमचा सल्ला! pic.twitter.com/zDFrUvget9
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) February 11, 2024
advertisement
छगन भुजबळांची भूमिका
दरम्यान याआधीही छगन भुजबळ यांनी ओबीसींच्या पक्षाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. 'ओबीसी नेत्यांनी पक्ष काढायचा निर्णय घेतला आहे. ओबीसी आरक्षण कसं वाचवायचं, यावर फोकस आहे. माझी ही भूमिका आहे. कोर्टाच्या लढाईवर फोकस करणं आवश्यक आहे. आम्ही रॅली घेतो त्यात सर्व पक्षांचे आमदार असतात, सर्वपक्षीय ओबीसी नेते रॅलीत एकत्र येतात. अशावेळी जर नव्या पक्षाचा विचार केला तर इतर सर्व मंडळी काय करणार? मतप्रवाह वेगवेगळे वाहतील, ओबीसी एकत्र येत आहेत, त्यात खंड पडेल का? यावर विचार करायला हवा. सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनचा एकत्र येऊन ओबीसी आरक्षण वाचवण्यावर फोकस असायला हवा, असं माझं स्पष्ट मत आहे,' असं छगन भुजबळ म्हणाले होते.
advertisement
मराठ्यांना वेगळं आरक्षण
दरम्यान आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात छगन भुजबळांनी पुन्हा एकदा मराठ्यांच्या वेगळ्या आरक्षणाची भूमिका घेतली. 'मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे, हे आमचं पहिल्यापासूनच मत आहे, पण यापूर्वीचे कायदे टिकले नाहीत, म्हणून हे सरकार येत्या अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी पुन्हा नव्याने कायदा करतंय, असं भुजबळांनी सांगितलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 11, 2024 8:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांची सगळ्यात मोठी ऑफर, छगन भुजबळ मान्य करणार?










