Raj Thackeray MNS: 'राज ठाकरे मेरा %&@, इधर कोई मराठी आया तो उसकी...', ठाण्यात मद्यपी परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:AJIT MANDHARE
Last Updated:
Raj Thacekray MNS : ठाण्यातील एक संतापजनक घटना समोर आली आहे. ठाण्यात बिगर मराठी परप्रांतीय तरुणांनी गोंधळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नेते अविनाश जाधव यांना शिविगाळ केली आहे.
ठाणे: मुंबई, ठाणे आणि राज्यात काही ठिकाणी मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद मागील काही दिवसांपासून सुरू झाला आहे. पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयानंतर मराठी विरुद्ध बिगरमराठी यांच्यातील वादाच्या घटना समोर आल्या. आता, ठाण्यातील एक संतापजनक घटना समोर आली आहे. ठाण्यात बिगर मराठी परप्रांतीय तरुणांनी गोंधळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नेते अविनाश जाधव यांना शिविगाळ केली आहे. इथं भैय्यांचे राज्य चालतं, असे बोलताना ही व्यक्ती दिसत आहे. परप्रांतीय तरुणांनी मराठी तरुणाला हिसकावून लावल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक २ वरील गांधीनगर परिसरात एका किरकोळ वादातून तणावाचे सावट निर्माण झाले. गाडी लावण्यावरून झालेल्या भांडणानंतर काही परप्रांतीय तरुणांनी दारूच्या नशेत मराठी तरुणाला धमक्या देत परिसरात गोंधळ घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासंदर्भात अतिशय अभद्र आणि विटंबन करणारे शब्द वापरल्याचा आरोप आहे.
advertisement
गाडी पार्किंगच्या वादातून सुरुवात
गांधीनगर भागात एका वाहनाच्या पार्किंगवरून दोन गटात वाद झाला. हा वाद क्षणात ताणला गेला आणि परिसरातील काही परप्रांतीय तरुणांनी मराठी तरुणाला दमदाटी करत अर्वाच्य शिविगाळ केली. “ये ठाणे का गांधीनगर है, यहां भैय्या का राज चलता है”, “कौण राज ठाकरे, कौण अविनाश जाधव मेरे XXX…” अशा अपमानास्पद उल्लेखांसह धमकीची भाषा वापरल्याचे समोर आले आहे.
advertisement
परप्रांतीय तरुणांनी एका मराठी युवकाला परिसरातून अक्षरश: हुसकावून लावले. “इधर कोई भी मराठी आया तो उसकी…” असा अवमानकारक इशारा देत परिसरात दादागिरी केल्याचेही समजते. घटनेदरम्यान काही तरुण दारूच्या नशेत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
advertisement
स्थानिकांमध्ये संतप्त भावना...
घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आणि संताप उसळून आला आहे. स्थानिक मराठी आणि मनसैनिकांमध्ये संताप व्यक्त केला असून शिविगाळ करणाऱ्या तरुणांचा शोध घेतला जात आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परिसरातील तणाव आणखी वाढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
November 24, 2025 9:58 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray MNS: 'राज ठाकरे मेरा %&@, इधर कोई मराठी आया तो उसकी...', ठाण्यात मद्यपी परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा


