३ कोटींच्या दागिन्यांची चोरी, ४ जणांवर संशय पण आरोपी भलताच, मोलकरणीची एन्ट्री अन्...

Last Updated:

घरातील बाथरूममध्ये एक गुप्त कपाट करून दागिने ठेवले होते. या कपाटाला दोन चाव्या होत्या. त्यात मोत्याचे नेकलेस, डायमंड इअररिंग्स, सोन्याचे कडे होते.

फोटो : प्रतिकात्मक (एआय)
फोटो : प्रतिकात्मक (एआय)
संकेत वरक, प्रतिनिधी, मुंबई : मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्याच्या हद्दीत 27 एप्रिल 2025 ते 26 जुलै 2025 या कालावधीत एका आलिशान इमारतीत तब्बल 3 कोटींच्या सोन्या–चांदीच्या दागिन्यांची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. घरमालक हे कामानिमित्त दुबईत राहत असत आणि दर दोन महिन्यांनी आईला भेटण्यासाठी मुंबईत येत. त्यांनी घरातील बाथरूममध्ये एक गुप्त कपाट करून दागिने ठेवले होते. या कपाटाला दोन चाव्या होत्या.
दुबईहून परतल्यानंतर फिर्यादी यांच्या पत्नीने कपाट उघडण्याचा प्रयत्न केला असता एकाच चावीने कपाट उघडल्याचे लक्षात आले. कपाट उघडताच त्यातील सर्व दागिने गायब झाल्याचे पाहून कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. यात मोत्याचे नेकलेस, डायमंड इअररिंग्स, सोन्याचे कडे यांसारख्या किमती दागिन्यांचा समावेश होता.

चार नोकरांवर संशय पण पुरावे नाहीत

या प्रकरणी सुरुवातीला घरातील चार नोकरांवर संशय घेण्यात आला. तीन जण हे घरमालकांच्या आईची देखभाल करणारे निवासी नोकर तर चौथी व्यक्ती वॉशरूमची साफसफाई करण्यासाठी रोज येत असे. सर्वांची कसून चौकशी करूनही कोणताही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. विशेष म्हणजे घरात CCTV नसल्याने तपास अधिकच अवघड झाला होता.
advertisement

अथक परिश्रमांतून पोलिसांना यश

मे महिन्यात घरमालकांच्या आईची देखभाल करण्यासाठी रोज ये–जा करणारी अर्चना साळवी हीच या चोरीची मुख्य सूत्रधार असल्याचे अखेर तपासात स्पष्ट झाले. वॉशरूममधील गुप्त कपाटातील दागिने तिनेच चोरल्याचे तिने कबूल केले आहे.

अर्चना साळवी कामावर कशी रुजू झाली?

अर्चनाला या घरात नोकरी मिळवून देणारी सुगंधा नावाची निवासी मोलकरणी आहे. गरज भासल्याने तात्पुरती सोय म्हणून अर्चनाला कामावर ठेवण्यात आले होते. मात्र त्याच काळात तिच्या हाती कपाटाची चावी लागली आणि तिने सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारण्याचा प्लॅन आखला.
advertisement
अर्चनाला कल्याण येथील तिच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली असून तिथूनच मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे समोर आले आहे. लालसेपोटी तिने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पोलrस आता या चोरीत अर्चनाला आणखी कुणाची मदत मिळाली का याचा तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
३ कोटींच्या दागिन्यांची चोरी, ४ जणांवर संशय पण आरोपी भलताच, मोलकरणीची एन्ट्री अन्...
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement