Dhurandhar: हिरो म्हणून फ्लॉप, Villain बनून दाखवला जलवा! Negative Roles ने चमकवलं बॉलिवूड सुपरस्टार्सचं नशीब
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Akshaye Khanna in Dhurandhar: बॉलिवूडमध्ये हिरो म्हणून यशस्वी होणे हे प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न असते, पण काही कलाकार असे आहेत, ज्यांना हिरोच्या नव्हे तर व्हिलनच्या भूमिकेने खरी ओळख दिली आणि त्यांच्या करिअरचा नकाशाच बदलून टाकला!
advertisement
advertisement
शाहरुख खान: सध्या किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुखच्या नशिबी सुरुवातीला फ्लॉप चित्रपटांची मालिका आली होती. पण १९९३ मध्ये 'बाजीगर' आणि 'डर' या दोन चित्रपटांतील सायको व्हिलनच्या भूमिकेने त्याला सुपरस्टार बनवले. रोमान्स किंग बनण्यापूर्वी त्याने सिद्ध केले की तो कोणत्याही प्रकारची भूमिका करू शकतो.
advertisement
advertisement
प्रियांका चोप्रा: मिस वर्ल्डचा किताब जिंकलेली प्रियांका चोप्रा २००४ मध्ये आलेल्या 'ऐतराज' चित्रपटात 'सोनिया रॉय' या महत्त्वाकांक्षी आणि खतरनाक व्हिलनच्या भूमिकेत दिसली. तिच्या करिअरमधील हा एक मोठा टर्निंग पॉइंट ठरला. या भूमिकेमुळे ती बोल्ड आणि कॉम्प्लेक्स भूमिका साकारण्यास सक्षम आहे हे सिद्ध झाले.
advertisement
जॉन अब्राहम: मॉडेलिंगमधून अभिनयात आलेल्या जॉन अब्राहमला खरी ओळख मिळाली ती २००४ च्या 'धूम' मधून! 'कबीर शर्मा' नावाचा स्टायलिश आणि चाणाक्ष चोर म्हणून तो प्रेक्षकांना इतका आवडला की, जॉनचा करिअरचा आलेखच वाढला आणि तो अॅक्शन हिरो म्हणून लोकप्रिय झाला. शाहरुखच्या पठाण या सिनेमातही त्याने व्हिलनची भूमिका अतिशय चोख बजावली.
advertisement
advertisement
संजय दत्तने 'अग्निपथ' च्या रिमेकमधील 'कांचा चिन्ना' या क्रूर व्हिलनच्या भूमिकेत जीव ओतला. यानंतर त्याची व्हिलन म्हणून एक वेगळी प्रतिमा तयार झाली. सध्याच्या घडीला सिनेमामध्ये व्हिलन म्हणून संजय दत्त असेल, तर तो सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार हे नक्की. नुकतंच संजय दत्त धुरंधर मध्ये दिसला. त्याच्या या चित्रपटातील भूमिकेचेही खूप कौतुक होत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना सध्या सर्वत्र 'धुरंधर' चित्रपटातील आपल्या भूमिकेमुळे चर्चेचा विषय बनला आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात त्याने 'रेहमान डकैत' या पाकिस्तानी गुन्हेगार आणि राजकारण्याची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात तो खलनायक असूनही सध्या रणवीर सिंहपेक्षाही त्याची क्रेझ पाहायला मिळतेय.
advertisement
advertisement









