Alcohol Fact : दारू प्यायल्यावर लोक English का बोलू लागतात? यामागील कारण ऐकून तुम्हाला Shock बसेल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
ज्या मित्राला कधीकधी धड हिंदीही बोलता येत नाही तो चार पेग झाल्यावर अचानक 'आय ॲम फीलिंग सो गुड!', 'व्हॉट इज युवर पॉईंट?', किंवा 'लेटेस्ट अपडेट्स आर ऑसम!' असे शब्द वापरू लागतो. किंवा त्याची इंग्रजी बोलण्याची स्टाईल खूपच 'फ्लो' मध्ये आल्यासारखी वाटते. पण कधी विचार केलाय का की असं का होतं?
पार्टीमध्ये किंवा फॅमेली गेट-टुगेदरमध्ये तुम्ही अनेकदा पाहिलं असेल किंवा तुम्हाला जाणवले असेल की कोणीतरी एखादी व्यक्ती अचानक इंग्रजीत बोलू लागते, तर कधीकधी पूर्ण इंग्रजी नाही वापरली तरी इंग्रजी शब्द तोंडातून निघू लागतात. कधीकधी तर अशा व्यक्तीच्या तोंडातून इंग्रजी ऐकायला येते, जी व्यक्ती आयुष्यात इंग्रजी बोलत नसेल किंवा बोलायला घाबरत असेल.
advertisement
advertisement
advertisement
1. 'फिल्टर' निघून जातोहे सर्वात मोठे कारण आहे. आपण जेव्हा शुद्धीत असतो, तेव्हा आपण काय बोलत आहोत, ते योग्य आहे की नाही, याचा विचार करतो. आपले बोलणे आणि सामाजिक वर्तन यावर आपला मेंदू एक 'फिल्टर' लावून ठेवतो. दारू पिल्यावर, ॲल्कोहोलमुळे मेंदूचा हा फिल्टर कमजोर होतो. त्यामुळे लाज, संकोच किंवा 'चूक होईल' ही भीती निघून जाते. अनेक लोकांना वाटते की इंग्रजी बोलताना त्यांची चूक होईल किंवा लोक हसतील. त्यामुळे ते साधारणता इंग्रजी बोलत नाही, पण दारु प्यायल्यावर हा भीतीचा अडथळा दूर झाल्यामुळे, मनात जे काही आहे, ते थेट (आणि अनेकदा इंग्रजीत) बाहेर पडते.
advertisement
2. आत्मविश्वासाची तात्पुरती वाढॲल्कोहोलमुळे तात्पुरता आत्मविश्वास वाढतो. आपण शाळेत किंवा कॉलेजमध्ये इंग्रजी बोलण्याचा सराव केलेला असतो. पण दैनंदिन जीवनात त्याचा वापर करत नाही. दारू पिल्यावर, हा दडपलेला आत्मविश्वास उसळी मारून बाहेर येतो. त्यांना अचानक वाटते की ते अत्यंत आत्मविश्वासाने आणि प्रभावीपणे इंग्रजी बोलू शकतात, मग त्यांचे व्याकरण चुकले तरी त्यांना फरक पडत नाही. हा आत्मविश्वास त्यांना 'स्मार्ट' असल्यासारखे वाटायला लावतो.
advertisement
3. सामाजिक ओळख आणि प्रभावकाहीवेळा हा बदल सामाजिक दबावामुळे किंवा 'Impress' करण्याच्या इच्छेमुळे होतो. कॉर्पोरेट किंवा सोशल सर्कल जर त्यांच्या मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये इंग्रजी बोलणे 'कूल' मानले जात असेल किंवा व्यावसायिक चर्चांमध्ये इंग्रजीचा वापर जास्त होत असेल, तर तो मित्र नकळतपणे त्या ग्रुपची भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो.जर तो मित्र पब किंवा हाय-फाय रेस्टॉरंटमध्ये असेल, तर त्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी तो आपोआप इंग्रजी शब्द वापरू लागतो. हा एक प्रकारचा 'सामाजिक देखावा' असतो.
advertisement
4. विचार आणि उच्चार मंदावणेहा सर्वात गमतीशीर भाग आहे. जास्त दारू पिल्यावर, मेंदू आणि तोंड यांच्यातील समन्वय बिघडतो. त्यामुळे उच्चार अस्पष्ट (Slurred) आणि मंदावलेले होतात. काहीवेळा तो व्यक्ती मराठीत बोलण्याचा प्रयत्न करत असतो, पण शब्दांचा उच्चार स्पष्ट होत नाही आणि ते ऐकणाऱ्याला 'वेगळीच' किंवा 'इंग्रजीसारखी' भाषा वाटू शकते.
advertisement
advertisement










