Nanded: लग्न झाल्यानंतरही मुलगी बॉयफ्रेंडला भेटायची, बापाने दोघांना संपवलं अन् विहिरीत फेकलं, ऑनर किलिंगनं नांदेड हादरलं
- Reported by:Mujeeb Shaikh
- Published by:Sachin S
Last Updated:
पुरोगामी महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात ऑनर किलिंगची घटना समोर आली आहे.
नांदेड: पुरोगामी महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात ऑनर किलिंगची घटना समोर आली आहे. विवाहित मुलीसह तिच्या प्रियकराची मुलीच्या वडिलांनी हत्या केली. त्यानंतर दोघांचेही मृतदेह हे विहिरीत फेकून दिले. या विहिरीत मुलीचा सुद्धा मृतदेह आढळला आहे. तर तिच्या प्रियकराचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील गोळेगाव ता. उमरी इथं २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. संजीवनी सुधाकर कमळे (वय १९ रा. गोळेगाव) आणि लखन बालाजी भंडारे (वय १७ रा. बोरजूनी) अशी मृत तरुण आणि तरुणीचे नाव आहे.
बोरजुनी येथील मूळचे रहिवासी असलेल्या या दोघांचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमप्रकरण चालू होतं. गेल्या वर्षी संजीवनी हिचा विवाह गोळेगाव येथील एका तरुणासोबत करून देण्यात आला होता. तरीही लपून-छपून या दोघांच्या गाठीभेटी चालूच होत्या. त्यांच्या प्रेमप्रकरणाला मुलीच्या आई वडिलांचा प्रखर विरोध होता. गेल्या वर्षभरापूर्वी मुलीचा विवाह झाला असल्याने काही महिन्यांपूर्वीच मुलाची समजूत काढून मुलीला भेटण्यास मज्जाव करण्याचा प्रयत्न झाला.
advertisement
संजीवनी आणि लखनला पकडलं
सोमवारी दुपारी मुलीचे सासर असलेल्या गोळेगाव इथं दोघांना एकत्र पकडण्यात आलं. सासरच्यांनी मुलीच्या वडिलांनाही तिथं बोलावून घेतलं. यावेळी संतापलेल्या मुलीच्या वडिलांनी आणि तिच्या कुटुंबीयांनी दोघांना बेदम मारहाण केली. यावेळी तिथे संजिवनीचा पती आणि सासरची माणसं सुद्धा हजर होती. सगळ्यांनी दोघांना अमानुषपणे मारहाण केली, या मारहाणी दोघांचा मृत्यू झाला.
advertisement
विहिरीत फेकले मृतदेह
view commentsत्यानंतर दोघांचेही मृतदेह जवळच असलेल्या बोरजुनी शिवारातील एका विहिरीत नेऊन टाकले. घटनेची माहिती समजताच भोकरच्या अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील, पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. रात्री मयत संजीवनी हिचा मृतदेह विहिरीतून काढण्यात आला. मात्र, रात्री उशिरापर्यंत लखन भंडारे याच्या प्रेताचा शोध लागू शकला नाही. सदर प्रकरणी मयत तरुणीचे वडील, पती , सासू-सासरे आदींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
Aug 25, 2025 11:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nanded: लग्न झाल्यानंतरही मुलगी बॉयफ्रेंडला भेटायची, बापाने दोघांना संपवलं अन् विहिरीत फेकलं, ऑनर किलिंगनं नांदेड हादरलं











