छ.संभाजीनगरमध्ये शिवसेना आमदाराच्या हॉटेलमध्ये अग्नितांडव, घटनास्थळाचा पहिला VIDEO
- Reported by:SIDHARTH GODAM
- Published by:sachin Salve
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर शहरातील धुळे-सोलापूर महामार्गावर करोडी टोल नाक्याजवळ हॉटेलला भीषण आग लागली आहे.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील धुळे-सोलापूर महामार्गावर करोडी टोल नाक्याजवळ हॉटेलला भीषण आग लागली होती. आमदार प्रदीप जैस्वाल यांचं हे हॉटेल असल्याचं समोर आलं आहे. हॉटेलमध्ये काही ग्राहक आणि कर्मचारी अडकल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. पण वेळीच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग आता आटोक्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील धुळे -सोलापूर महामार्गावर आमदार प्रदीप जैस्वाल यांचं ग्रँड सरोवर हॉटेल आहे. आज संध्याकाळच्या सुमारास या हॉटेलला भीषण आग लागली.
छत्रपती संभाजीनगर शहरातील धुळे सोलापूर महामार्गावर
ग्रँड सरोवर हॉटेलला भीषण आग; आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हॉटेल असल्याची माहिती pic.twitter.com/N52uJIGNzU
— News18Lokmat (@News18lokmat) April 10, 2025
advertisement
अचानक आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. हॉटेलच्या तळ मजल्यापासून ते छतापर्यंत आगाने विळखा घातला होता. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी ६ अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. अखेरीस शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीचे कारण अजूनपर्यंत अस्पष्ट आहे. मात्र शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
view commentsLocation :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Apr 10, 2025 8:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
छ.संभाजीनगरमध्ये शिवसेना आमदाराच्या हॉटेलमध्ये अग्नितांडव, घटनास्थळाचा पहिला VIDEO











