MPSC Success Story: कुठलाही क्लास न लावता पुण्याची गृहिणी बनली क्लास वन ऑफिसर; संसार सांभाळत घवघवीत यश!
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
पुण्यातील मीनल सोळंके यांनी राज्यसेवा परीक्षेत 379 वा रँक मिळवत यश संपादन केले आहे. लग्नानंतर देखील अभ्यासात सातत्य ठेवत त्यांनी यश प्राप्त केलं आहे.
आयुष्यात लग्नानंतर अनेक महिलांना जबाबदाऱ्यांचे ओझे आणि कौटुंबिक धावपळ यामुळे स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवावे लागते. परंतु पुण्यातील मीनल वसंत पोटे यांनी मात्र समाजातील हाच समज खोटा ठरवून दाखवला आहे. नुकत्याच लागलेल्या राज्यसेवेच्या निकालात मीनल पोटे यांनी राज्यातून 379 रँक मिळवत क्लास वन पदाला गवसणी घातली आहे.
लग्नानंतर घर, संसार आणि अभ्यास या तिन्ही गोष्टीचा समन्वय साधत मीनल पोटे यांनी यश संपादन केले आहे. याबद्दलची अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना मीनल पोटे यांनी दिली. मूळच्या पुण्यातील असलेल्या मीनल पोटे यांचे अभियांत्रिकी आणि लॉ चे शिक्षण पूर्ण झालेले आहे.पुण्यातील सिंहगड कॉलेज मधून मीनल यांनी शिक्षण पूर्ण केले. लग्नानंतर देखील मीनल यांनी स्पर्धापरीक्षेचा अभ्यास कायम ठेवला. मीनल पोटे यांचे पती चेतन सोळंके हे पुण्यातील DRDO मध्ये सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत.
advertisement
मीनल यांनी सांगितले की,"लग्नानंतर देखील मी माझा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कायम ठेवला.पती चेतन यांनी आणि संपूर्ण कुटुंबाने दिलेल्या खंबीर पाठिंब्यामुळे मला नेहमीच प्रेरणा मिळत गेली. लग्नानंतर अनेक महिला स्वप्न थांबवतात, पण माझा विश्वास होता की योग्य नियोजन आणि दृढ इच्छाशक्ती असेल तर काहीही शक्य होऊ आहे.प्रत्येक स्त्रीला स्वतःसाठी आणि स्वतःच्या स्वप्नासाठी खंबीर राहणं गरजेचं आहे". मीनल पोटे यांनी विवाह नंतर घर, संसार आणि अभ्यास यांनी गोष्टींचा सुरेख समतोल सादर राज्यसेवा परीक्षेत उल्लेख नियोजन संपादन केले आहे.
advertisement
कौटुंबिक जबाबदाऱ्यांबरोबरच अभ्यासासाठी वेळ मिळवणे, घरची कामे आणि अभ्यास अशा धावपळीच्या तीन क्रमातही त्यांनी आपला आत्मविश्वास कायम ठेवला. त्यांचा या यशामुळे समाजातील अनेक महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे. मीनल पोटे यांचा यशाबद्दल समाजातील प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 01, 2025 10:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
MPSC Success Story: कुठलाही क्लास न लावता पुण्याची गृहिणी बनली क्लास वन ऑफिसर; संसार सांभाळत घवघवीत यश!

