इंजिनिअरींग आणि मेडिकलच्या SEBC-OBC विद्यार्थ्यांसाठी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची मोठी घोषणा
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Chandrakant Patil: अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशांसाठी एसईबीसी-ओबीसी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पुन्हा तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील विविध शैक्षणिक संस्थामधील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी (अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित) एसईबीसी व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी यापूर्वी प्रेवश घेतल्यानंतर सुरुवातीला सहा महिने आणि त्यानंतर तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही काही विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
ही मुदतवाढ शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेश निश्चित झालेले आहेत, परंतु ठराविक कालावधीत त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही.आणि दिलेल्या वाढीव कालावधीतही जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात आले नाही.या विद्यार्थ्यांसाठी लागू असेल.आणि यानंतरही वाढीव मुदतीत प्रमाणपत्र सादर केले नाही तर संबंधित विद्यार्थीच जबाबदार राहतील. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध करून देण्यात आला आहे, असेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 26, 2025 9:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
इंजिनिअरींग आणि मेडिकलच्या SEBC-OBC विद्यार्थ्यांसाठी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची मोठी घोषणा