MNS Jagar Yatra : मुंबई - गोवा महामार्गासाठी मनसेची जागर यात्रा; अमित ठाकरेंचा सरकारला इशारा
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
मनसेचे सर्व नेते आज रस्त्यावर उतरत आहेत. मनसे मुंबई गोवा महामार्गाच्या मुद्द्यावरून आता आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे
मुंबई 27 ऑगस्ट : मुंबई - गोवा महामार्गचे रखडलेले काम सुरु व्हावे, कोकणातील रस्ते खड्डे मुक्त व्हावेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कोकण जागर यात्रा काढली आहे. यातून सरकारचा निषेध करण्यात येत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न आता पुन्हा चर्चेत आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून सवाल उपस्थित करत होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणामध्ये अनेकदा हा मुद्दा उपस्थित केला आहे. मनसेच्या अनेक आंदोलनांनंतर आज अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मुंबई गोवा महामार्गावर जागर यात्रा काढण्यात आली.
पनवेलच्या पळस्पे फाट्यापासून खारपाडा हा या यात्रेचा पहिला टप्पा आहे. मनसेचे सर्व नेते आज रस्त्यावर उतरत आहेत. मनसे मुंबई गोवा महामार्गाच्या मुद्द्यावरून आता आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. राज्यभरातील मनसे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत. या आंदोलनामुळे मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मनसेच्या जागर यात्रेचा वाहतुकीवरती मोठा परिणाम झाला आहे. याठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
advertisement
'17 वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी आंदोलन करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना देशद्रोही म्हणणार असाल, तर ह्या खराब रस्त्यामुळे अपघातात जे मृत्युमुखी पडले त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना काय म्हणायचं? मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न प्रचंड गंभीर आहे. आज आम्ही शांततेत पदयात्रा काढतोय. पण तरीही काही सुधारणा होणार नसेल तर पुढचं आंदोलन अधिक तीव्र, आक्रमक करू. महाराष्ट्र सैनिक आणि कोकणी माणूस तुम्हाला अनुभवायला मिळेल', असा इशारा अमित ठाकरे यांनी दिला आहे.
Location :
First Published :
August 27, 2023 11:12 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
MNS Jagar Yatra : मुंबई - गोवा महामार्गासाठी मनसेची जागर यात्रा; अमित ठाकरेंचा सरकारला इशारा