5 कोटींची ऑफर नाकारली, राज ठाकरेंनी स्टेजवर बोलवून केलं कौतुक, 'त्या' उमेदवाराचं काय झालं?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
ठाणे महानगर पालिका निवडणुकीत पाच कोटींची कथित ऑफर नाकारून निवडणुकीच्या मैदानात उतरणाऱ्या राजश्री नाईक यांचं काय झालं?
महानगर पालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी पैसे वाटल्याचे प्रकार उघडकीस आले होते. अगदी आपल्या प्रभागातून बिनविरोध निवड व्हावी, म्हणूनही धनाढ्य उमेदवारांकडून पैशांचा पाऊस पाडला जात होता. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी साम दाम दंडचा वापर केला जात होता. जे उमेदवार माघार घेण्यास तयार नाहीत, त्यांना कोट्यवधी रुपयांची ऑफर दिली जात होती.
अशात मनसेच्या ठाण्यातील उमेदवार राजश्री नाईक यांना देखील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पाच कोटींची ऑफर दिली होती. पण त्यांनी ही ऑफर नाकारली. काहीही झालं तरी निवडणूक लढणार, असा इरादा नाईकांनी स्पष्ट केला. ठाण्यात झालेल्या एका जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजश्री नाईक यांच्या प्रामाणिकपणाचे जाहीर कौतुक केलं होतं. "निवडणूक लढवू नये यासाठी राजश्री नाईक यांना ५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, पण त्यांनी ती धुडकावून लावली," असं सांगत राज ठाकरेंनी त्यांना व्यासपीठावर बोलावून त्यांचं कौतुक केलं होतं. त्यामुळे या निवडणुकीत राजश्री नाईक यांचं काय होणार? याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं.
advertisement
पण मनसेच्या उमेदवार राजश्री नाईक यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. शिवसेना (शिंदे गट) उमेदवार नम्रता हेमंत पमनानी यांनी त्यांचा पराभव केला. राजश्री नाईक या ठाण्याच्या प्रभाग क्रमांक २० मधून निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या. या प्रभागात कोपरी कॉलनी, चेंदणी पूर्व, पारसी कॉलनी, ठाणेकरवाडी आणि बारा बंगला असं शिंदे गटाचं वर्चस्व असलेल्या भागाचा समावेश होतो. इथं अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली.
advertisement
पण या निवडणुकीत नम्रता पमनानी यांनी राजश्री यांचा ७२९५ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत नम्रता हेमंत पमनानी यांना १६ हजार ५७५ मतं मिळाली. तर राजश्री नाईक यांना ९ हजार २८० मतं मिळाली. नम्रता पमनानी यांनी नाईक यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला असून, या प्रभागावर शिंदे गटाने आपले वर्चस्व कायम राखले आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 8:29 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
5 कोटींची ऑफर नाकारली, राज ठाकरेंनी स्टेजवर बोलवून केलं कौतुक, 'त्या' उमेदवाराचं काय झालं?








