पुण्यातील सोनालीनं गोड बोलून घेतली साडेतीन कोटींची औषधं, मग केलं असं कांड, औषध वितरक शॉक
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
सोनाली गिरीगोसावी हिने सुरुवातीला सदाशिव पेठेतील 'सिनिअर एजन्सी'मधून रोखीने औषधे खरेदी करून मालक दिनेश कर्नावट यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर खरा खेळ सुरू झाला
पुणे : पुणे शहरातील सदाशिव पेठेतील एका बड्या औषध वितरकाची ३ कोटी ५४ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनाली लक्ष्मण गिरीगोसावी आणि जयेश वसंत जैन या दोघांनी औषध क्षेत्रात फसवणुकीचं मोठं जाळं विणल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत त्यांच्याविरोधात एकूण चार गुन्हे दाखल झाले आहेत.
फसवणुकीची पद्धत: आरोपी सोनाली गिरीगोसावी हिने सुरुवातीला सदाशिव पेठेतील 'सिनिअर एजन्सी'मधून रोखीने औषधे खरेदी करून मालक दिनेश कर्नावट यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, "जयेश जैन याला क्रेडिटवर (उधारीवर) माल द्या, त्याचे पैसे मी देईन," असे आश्वासन तिने दिले. या विश्वासावर १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत आरोपींनी ३ कोटी ५४ लाख ५५ हजार ३२९ रुपयांची औषधे नेली. मात्र, मालाचे पैसे न देता त्यांची फसवणूक केली.
advertisement
गुन्ह्यांचा आकडा १८ कोटींच्या पार: या दोघांविरुद्ध पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये आतापर्यंत चार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणांमधील फसवणुकीची एकूण रक्कम १८ कोटी रुपयांहून अधिक आहे. विशेष म्हणजे, न्यायालयाने या दोघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे, तरीही आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
advertisement
विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जानराव या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. औषध बाजारपेठेत इतक्या मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याने वितरकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 8:23 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातील सोनालीनं गोड बोलून घेतली साडेतीन कोटींची औषधं, मग केलं असं कांड, औषध वितरक शॉक









