Mumbai News : बेस्टचा प्रवास आता बदलणार! अनेक जुने मार्ग बंद; 'हे' नवीन वेळापत्रक नक्की पहा
Last Updated:
Mumbai Besti Bus Route Changes : टाटा मुंबई मॅरेथॉन 2026 रविवारी पार पडणार असून, यामुळे दक्षिण आणि मध्य मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. अनेक बेस्ट बस मार्ग वळवण्यात आले असून काही मार्ग तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत.
मुंबई : मुंबईची ओळख असलेली 'टाटा मुंबई मॅरेथॉन 2026' येत्या रविवारी म्हणजेच 18 तारखेला मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या मॅरेथॉन स्पर्धेमुळे दक्षिण आणि मध्य मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. विशेषतहा बेस्ट बस सेवांमध्ये बदल आणि काही मार्ग तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
मुंबईतील बेस्ट बस सेवेत मोठे फेरबदल
मॅरेथॉन स्पर्धा पहाटे 5 वाजल्यापासून दुपारी 1.30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत स्पर्धेच्या मार्गावर वाहतूक निर्बंध लागू असणार आहेत. त्यामुळे या मार्गांवरून धावणाऱ्या बेस्ट बसगाड्या पर्यायी मार्गांनी वळवण्यात येणार आहेत. मॅरेथॉनचा मुख्य मार्ग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुरू होऊन हुतात्मा चौक, चर्चगेट, मरीन ड्राईव्ह, पेडर रोड, हाजी अली, वांद्रे-वरळी सागरी सेतू (सी-लिंक), माहिम आणि प्रभादेवी असा असणार आहे.
advertisement
बसचा बदललेला मार्ग कसा असेल?
वाहतूक पोलिसांनी घातलेल्या निर्बंधांमुळे काही बसगाड्या शीव (सायन) मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जे.जे. रुग्णालय, कर्नाक बंदर पूल, पी. डिमेलो रोड आणि शहीद भगतसिंग मार्गे धावतील. तर माहिम मार्गावरील बसगाड्या सेनापती बापट मार्ग, डॉ. ई. मोझेस मार्ग, महालक्ष्मी स्थानक आणि सातरस्ता मार्गे वळवण्यात आल्या आहेत.
काही बेस्ट बस मार्ग राहणार पूर्णपणे बंद
दरम्यान प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी काही बस मार्ग तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये अ-76, अ-77, अ-78, अ-105, अ-106, अ-108, अ-112, अ-118, अ-123, अ-132, अ-137 आणि अ-155 या मार्गांचा समावेश आहे.
advertisement
रविवारी सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी प्रवाशांनी बदललेल्या मार्गांची माहिती घेण्याचे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे. दुपारी 1.30 नंतर सर्व बस सेवा आधीच्या वेळेसारखी सुरू होईल.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 7:59 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : बेस्टचा प्रवास आता बदलणार! अनेक जुने मार्ग बंद; 'हे' नवीन वेळापत्रक नक्की पहा









