मोठी बातमी, मनसे उपाध्यक्षाने फोडलं आपल्याच नेत्याचं कार्यालय, अकोल्यातील घटनेमुळे खळबळ

Last Updated:

अकोल्यामध्ये मनसेच्या उपाध्यक्षानेच आपल्या जिल्हाध्यक्षाचं कार्यालय फोडलं आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

News18
News18
कुंदन जाधव, प्रतिनिधी
अकोला : राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरांनी डोक वर काढलं आहे. तर दुसरीकडे, मनसेमध्येही बंडखोरांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. अकोल्यामध्ये मनसेच्या उपाध्यक्षानेच आपल्या जिल्हाध्यक्षाचं कार्यालय फोडलं आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनसे महिला जिल्हा अध्यक्ष प्रशंसा अंबेरे यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. मनसे महानगर उपाध्यक्ष अविनाश मुरेकर यांनीच ही तोडफोड केली असल्याची माहिती समोर आली आहे. कार्यालयातील फर्निचरचं साहित्यांची तोडफोड केली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. तोडफोडीचे कारण अस्पष्ट आहे. मनसे सैनिक तक्रारीसाठी जुनेशहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहे.
advertisement
अधिक माहिती अशी की, उमेदवारी अर्ज छाननी होऊन बाद उमेदवारांची नावे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहेत. त्यात, अकोला जिल्ह्यात चक्क मनसेच्या उमेदवाराचाच अर्ज बाद झाल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता. या घटनेनंतर, जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा असून, आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही संबंधित उमेदवारावर केला जात आहे. त्यातून, त्यांच्या मनसे कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार घडला असल्याची माहिती आहे.
advertisement
अकोल्यातील डाबकी रोड भागातल्या आठवडी बाजार चौकात अंबेरे यांचं कार्यालय आहे. अंबेरे यांनी विरोधी उमेदवारांशी हातमिळवणी करून जाणीवपूर्वक आपलं वय कमी असल्याची बाब लपवल्याचा आरोप आता मनसेच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. मनसेचे शहर उपाध्यक्ष अविनाश मुरेकर आणि इतर कार्यकर्त्यांनी कार्यालयात घुसून ही तोडफोड केल्याची माहिती आहे.
उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या प्रकारात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेनंतर घटनास्थळावर पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. मात्र, येथील मतदारसंघात मनसेचा उमेदवार अपात्र ठरल्याने मनसैनिक आणि मनसे पक्षासाठी हा मोठा झटका आहे.
advertisement
दरम्यान, विकृत मानसिकतेतून कार्यालय फोडल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष यांनी केला आहे. महानगर मनसे उपाध्यक्ष अविनाश मुरेकर यांनी हे कार्यालय फोडलं असल्याचा आरोप आहे. हे कार्यालय फोडण्या मागे अविनाश मुरेकर हे विकृत मानसिक असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष राजेश काळे यांनी केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोठी बातमी, मनसे उपाध्यक्षाने फोडलं आपल्याच नेत्याचं कार्यालय, अकोल्यातील घटनेमुळे खळबळ
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement