मोठी बातमी: MPSC परीक्षा पुढे ढकलली, पुण्यातील आंदोलनाला मोठं यश, पुढील तारीख कोणती?

Last Updated:

राज्य सेवेच्या मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून आंदोलनाला मोठे यश आले आहे.

News18
News18
पुणे:  राज्य सेवेच्या मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून आंदोलनाला मोठे यश आले आहे. राज्यसेवेची मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता मुख्य परीक्षा 26, 27 आणि 28 मे रोजी होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ट्वीट करत ही घोषणा करण्यात आली.
एमपीएससीने आज बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास साडे सात हजार उमेदवार परीक्षेसाठी बसले होते. आज आयोजित केलेल्या आयोगाच्या या बैठकीमध्ये मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उमेदवार गेले दोन दिवस परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. अखेर एमपीएससीने नव्या तारख्या जाहीर केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे
advertisement

MPSC ने आपल्या परिपत्रकात काय म्हटले?

राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या सुधारित निकालानुसार नव्याने पात्र ठरलेल्या या 318 उमेदवारांना राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 च्या पूर्वतयारीसाठी पुरेसा अवधी मिळाला नसल्यामुळे दिनांक 26 ते 28 एप्रिल, २०२५ या कालावधीत नियोजित मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उमेदवारांकडून आयोगास निवेदने प्राप्त झाली आहेत. उमेदवारांकडून प्राप्त निवेदने तसेच इतर सर्व बाबींचा साकल्याने विचार करून प्रस्तुत राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 सुधारित वेळापत्रकानुसार दिनांक 27, 28 आणि २९ मे 2025 या कालावधीत घेण्यात येईल. .
advertisement

MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्या काय होत्या ?
  • मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलाव्या
  • अ राजपत्रित परीक्षेत पदांची संख्या वाढवावी
  • PSI, STI, ASO, SR या पदांची संख्या वाढवावी
  • SEBC-EWSच्या निकालातील चुकांविरोधात आंदोलन

विद्यार्थ्यांनी केले होते आंदोलन?

पुणे, छत्रपती संभाजीनगरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होते. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला होता. MPSC ने परीक्षा पुढे ढकलल्याचे नोटिफिकेशन काढल्यापासून 45 दिवसानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्यात यावी...MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या अ राजपत्रित परीक्षेत PSI, STI, ASO आणि SR या पदांची संख्या वाढवण्यात यावी, अशा मागण्या विद्यार्थ्यांच्या आहेत
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोठी बातमी: MPSC परीक्षा पुढे ढकलली, पुण्यातील आंदोलनाला मोठं यश, पुढील तारीख कोणती?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement