Tuljapur: भक्तांना तुळजाभवानी पावली! नवरात्री आणि कोजागिरीनिमित्त एसटीचा मोठा प्लॅन

Last Updated:

Tuljapur: नवरात्री आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक तुळजापुरात येतात.

Tuljapur: भक्तांना तुळजाभवानी पावली! नवरात्री आणि कोजागिरीनिमित्त एसटीचा मोठा प्लॅन
Tuljapur: भक्तांना तुळजाभवानी पावली! नवरात्री आणि कोजागिरीनिमित्त एसटीचा मोठा प्लॅन
धाराशिव: नवरात्रीनंतर येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी देखील अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी जातात. विशेषत: कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या तुळजापुरात प्रचंड गर्दी होते. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जय्यत तयारी केली आहे. नवरात्री आणि कोजागिरीनिमित्त विविध शहरांतून हजारो बस तुळजापूरच्या दिशेने धावणार आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षी नवरात्री आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी तुळजापुरात भाविक दाखल होतात. महाराष्ट्रासह शेजारच्या कर्नाटक राज्यातूनही हजारो भाविक दर्शनासाठी येतात. काही भाविक पायी, खासगी वाहनाने तर काही भाविक एसटीबसने तुळजापूरला येतात. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत 200 बसेस धावणार आहेत. तर 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत तब्बल 1100 बसेस तुळजापूरसाठी धावणार आहेत.
advertisement
विभागीय वाहतूक अधिकारी अभय देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात विभागस्तरावरून 200 गाड्यांचं नियोजन केलेलं आहे. कर्नाटक राज्य वाहतूक आणि सोलापूर वाहतुकीसाठी इतर विभागातील आणखी 35 बसेस तात्पुरत्या स्वरुपात लागणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात 1100 बसेस तुळजापूर येथून धावणार आहे. बस दुरुस्ती आणि तिकीट तपासण्यासाठी पथकं नेमण्यात आली आहेत. भाविकांची गैरसोय होणार नाही, याची एसटी महामंडळ काळजी घेणार आहे.
advertisement
एसटी पार्किंगची व्यवस्था
तुळजापुरात बस पार्किंगसाठी सोय करण्यात आली आहे. तुळजापूर आगारात कर्नाटक राज्यातील वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण 100 बसच्या पार्किंगची व्यवस्था केली आहे. धाराशिव रोडवरील मुक्तांगण शाळा परिसरात धाराशिव, सोलापूर, बीड, अहिल्यानगर, परभणी विभागातील 225 बस थांबण्याची व्यवस्था असणार आहे. मंगरूळ रोड पार्किंगवर पुणे प्रदेशातील 350 बसेस आणि काक्रंबा बायपास चौकाजवळ लातूर विभागातील 125 बस पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Tuljapur: भक्तांना तुळजाभवानी पावली! नवरात्री आणि कोजागिरीनिमित्त एसटीचा मोठा प्लॅन
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement