दिवाळी गोड! 'लाडकी बहीण' योजनेचे पैसे खात्यात; E-KYC न केलेल्यांचं काय होणार?

Last Updated:

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर हप्ता दिवाळीपूर्वी जमा झाला असून आदिती तटकरे यांनी EKYC तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. EKYC न झाल्यास पुढील हप्ता मिळणार नाही.

News18
News18
मुंबई: राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थींच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास विभागाच्या वतीने दिवाळी सणाच्या तोंडावरच हा हप्ता वितरित करण्यात आल्यामुळे राज्यातील 'लाडक्या बहिणींची' दिवाळी आजपासूनच गोड होणार आहे.
सप्टेंबरचा हप्ता मिळण्यास सुरुवात
योजनेच्या अंमलबजावणीत सुरूवातीला ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत असल्याने, सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी केवायसीची अट शिथिल करण्यात आली होती. यामुळे तांत्रिक अडचण असूनही अनेक पात्र भगिनींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. मात्र, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व लाभार्थींना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जरी सप्टेंबरचा हप्ता KYC शिवाय जमा झाला असला तरी, ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.
advertisement
याबाबतचा इशारा देताना मंत्री महोदयांनी स्पष्ट केले की, जी लाभार्थी बहीण केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करणार नाही, त्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे दिवाळीनंतर पुढील हप्ता नियमितपणे जमा होण्यासाठी सर्व पात्र भगिनींनी त्वरित आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
EKYC करणं बंधनकारक
ज्या लाभार्थ्यांनी अजूनही E KYC केली नाही त्यांना ती तातडीनं पूर्ण करा. दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार आहे. या E KYC साठी नवरा किंवा वडिलांचं आधार कार्ड जोडणं बंधनकारक आहे. त्याशिवाय E KYC ची प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे अनेकांनी ही अट शिथिल करण्याची मागणी केली आहे. लाडकी बहीणच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही EKYC करु शकता.
advertisement
कसं करायचं E KYC
तुम्ही ज्या योजनेसाठी किंवा सेवेसाठी ई-केवायसी करत आहात, त्या अधिकृत सरकारी पोर्टलवर भेट द्या.
पोर्टलवर 'E-KYC' चा पर्याय निवडून तुमचा १२ अंकी आधार क्रमांक भरा.
आधार क्रमांक भरल्यानंतर, Send OTP ओटीपी पाठवा) या बटणावर क्लिक करा.
तुम्हाला तुमच्या नवऱ्याचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक द्यायचा आहे.
तुमच्या आधार कार्डाशी लिंक असलेल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक सहा अंकी OTP येईल.
advertisement
हा OTP पोर्टलवर दिलेल्या जागेत भरा आणि Verify बटणावर क्लिक करा.
OTP यशस्वीरित्या पडताळला गेला की, तुमचे नाव, पत्ता आणि फोटो आधार डेटाबेसवरून घेतले जातात आणि तुमची E-KYC प्रक्रिया पूर्ण होते.
महायुती सरकारची लाडकी बहीण योजना सर्वात जास्त राज्यात हिट ठरली. 1500 रुपये प्रति महिना लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला खात्यावर येतात. ज्या महिलांकडे गाडी आहे, अडीच लाख रुपयांहून अधिक उत्पन्न आहे अशा सगळ्या महिलांची नावं या यादीमधून वगळण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दिवाळी गोड! 'लाडकी बहीण' योजनेचे पैसे खात्यात; E-KYC न केलेल्यांचं काय होणार?
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement