चाकरमान्यांसाठी मोठी बातमी! मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून मोठा बदल, नेमकं कारण काय?

Last Updated:

महाराष्ट्राचा महाउत्सव गणेशोत्सवाला सूरूवात होण्यास आता अवघे पाच दिवस उरले आहेत.त्यामुळे चाकरमान्यांनी कोकणाची वाट धरायला सूरूवात केली आहे.

mumbai goa highway
mumbai goa highway
Mumbai Goa Highway Heavy Vehical ban : महाराष्ट्राचा महाउत्सव गणेशोत्सवाला सूरूवात होण्यास आता अवघे पाच दिवस उरले आहेत.त्यामुळे चाकरमान्यांनी कोकणाची वाट धरायला सूरूवात केली आहे. या दरम्यान होणारी वाहतुक कोंडी आणि अपघाताची शक्यता लक्षात घेता. मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक आजपासून बंद करण्यात आली आहे. अवघड वाहतुकीवर 3 टप्प्यात निर्बंध लादण्यात आले आहे.त्यामुळे या निर्बंधामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक आजपासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे 3 टप्प्यात अवजड वाहतुकीवर निर्बंध लादण्यात आले आहेत.
गणपतीचे आगमन होत असताना किंवा पूर्व तयारीचा प्रवास म्हणून 23 ऑगस्ट 2025च्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 28 ऑगस्ट 2025च्या रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहतूक सूरू राहणार आहे. 5 व 7 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होत असताना 31 ऑगस्ट सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद राहणार आहे. तसेच 2 सप्टेंबर रोजी देखील सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद राहणार आहे.
advertisement
दरम्यान महामार्गावरील अवजड वाहतूक रोखण्यासाठी रत्नागिरी आरटीओची पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच कशेडी घाटापासून ते खारेपाटण पर्यंत आरटीओ विभागाकडून महामार्गावर 24 तास गस्त घालण्यात येणार आहे.
अनंत चतुर्थीच्या गणपतीचे विसर्जन होत असताना 6 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते 7 सप्टेंबरच्या रात्री 8 वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद राहणार
advertisement

'या' वाहनांवर बंदी नाही

जयगड बंदर आणि जेएनपीटी बंदर येथून आयात निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहने दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, औषध, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्, भाजीपाला, नाशवंत माल, या जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना हा नियम लागू होणार नाही आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चाकरमान्यांसाठी मोठी बातमी! मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून मोठा बदल, नेमकं कारण काय?
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement