BMC: मुंबई महानगरपालिकेत 5 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय, आदेश जारी
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
BMC News: मुंबई महापालिकेतील चार सहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांचा निर्णय शुक्रवारी रात्री जारी करण्यात आला.
सुस्मिता भदाणे, प्रतिनिधी, मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) विविध अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनेचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहेत. या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंत्यांच्या पदांवर बदल करण्यात आले असून काही अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे.
कोणकोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या?
या आदेशानुसार, गणानन विनायक वेलांडे यांची सहाय्यक आयुक्त (एन विभाग) येथून सहाय्यक आयुक्त (ए विभाग) येथे बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे कार्यनिर्देशक व संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कायम ठेवण्यात आला आहे. तसेच रोहित कनककुमार त्रिवेदी यांना सहाय्यक आयुक्त (ई विभाग) ऐवजी आर/उत्तर विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
advertisement
आनंद भारकरराव केंकळ यांना सहाय्यक आयुक्त (ई विभाग) पदाचा पूर्णकालिक कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर नयनिश येमुलकर आणि जयदीप मोरे यांना त्यांच्या अतिरिक्त जबाबदाऱ्यांमधून मुक्त करून नगर अभियंता विभागाकडे प्रत्यावर्तित करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या आदेशानुसार हे सर्व बदल २७ मार्च २०२६ पासून किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी नवीन पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लागू होणार आहेत. बदल्यांच्या निर्णयानंतर प्रशासनातील कामकाज अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 8:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC: मुंबई महानगरपालिकेत 5 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय, आदेश जारी






