Election : शाळा बंद, शेअर बाजारात सुट्टी आणि शहरात ड्राय डे किती दिवस?; निवडणूकीदरम्यान तुमच्या शहरात काय सुरू काय बंद!
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Election Update : सगळ्या शेड्यूलचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. अगदी मुलांच्या शाळेपासून ते गुंतवणुकीपर्यंतचेच्या या परिणामांबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
मुंबई : महानगरपालिकेची निवडणूक ही कोणत्याही शहराच्या लोकशाहीचा कणा असते. मुंबईसारख्या महानगरासाठी तर BMC निवडणूक म्हणजे मिनी विधानसभाच मानली जाते. निवडणुका फक्त मतदान करण्यापुरत्या मर्यादित नसून, त्या दिवशी संपूर्ण शहराची गती आणि दैनंदिन व्यवस्था बदलते. येत्या 15 जानेवारीला राज्यभरात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने सुरक्षेच्या आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. 15 जानेवारीला वोटिंग आहे तर 16 जानेवारीली काउंटिंग म्हणजेच मत मोजणी आहे आणि या सगळ्या शेड्यूलचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. अगदी मुलांच्या शाळेपासून ते गुंतवणुकीपर्यंतचेच्या या परिणामांबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
शाळांना सुटी किती दिवस?
निवडणुकीच्या दिवशी मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी राज्यातील बहुतांश शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी एकच दिवस म्हणजे 15 जानेवारीला जाहीर केली आहे. राज्यातील बहुतांश सरकारी आणि खासगी शाळांचा वापर 'मतदान केंद्र' म्हणून केला जातो. त्यामुळे 14 जानेवारीपासूनच शाळेच्या इमारती निवडणूक आयोगाच्या ताब्यात दिल्या जातात.
advertisement
शाळांमधील शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी (Polling Officers) केली जात असल्याने 15 जानेवारी रोजी शाळेचं कामकाज बंद राहील. पालकांनी शाळांकडून येणाऱ्या अधिकृत सूचनांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
शेअर बाजार किती दिवस राहणार बंद?
मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र आहे, मात्र निवडणुकीच्या दिवशी मतदानाची टक्केवारी वाढावी आणि कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी शेअर बाजारही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 15 जानेवारी रोजी कोणतेही व्यवहार होणार नाहीत. म्हणजे त्या दिवशी स्टॉकमार्केट देखील बंद राहिल. शेअर बाजार बंद असल्याने बॅंकिंग व्यवहार आणि सेटलमेंटच्या तारखांमध्येही बदल होऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपले व्यवहार त्याआधीच नियोजित करणे सोयीचे ठरेल.
advertisement
शहरात 'ड्राय डे' कधी दिवस आहे?
निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यात 'ड्राय डे' जाहीर केला आहे. हा ड्राय डे चार दिवस असणार आहे. 13 जानेवारीपासून ते 16 जानेवारीपर्यंत शहरात ड्राय डे आहे. यामुळे शहरातील सर्व मद्यविक्रीची दुकाने, परमिट रूम्स आणि बिअर बार बंद राहतील. मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शांतता राखली जावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
advertisement
बीएमसी निवडणूक ही केवळ राजकीय घडामोड नसून ती मुंबईकरांच्या अधिकाराची पर्वणी आहे. शाळा, शेअर बाजार आणि दुकाने बंद ठेवण्यामागचा मूळ उद्देश हाच आहे की, प्रत्येक नागरिकाने आपल्या घराबाहेर पडावे आणि मतदानाचा हक्क बजावावा. त्यामुळे या सुटीचा आनंद घेण्यासोबतच जबाबदार नागरिक म्हणून मतदान केंद्रावर नक्की जा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 12, 2026 8:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Election : शाळा बंद, शेअर बाजारात सुट्टी आणि शहरात ड्राय डे किती दिवस?; निवडणूकीदरम्यान तुमच्या शहरात काय सुरू काय बंद!








