अनंत चतुदर्शीच्या दिवशी मुंबईतील 12 पूल राहणार बंद, वाचा एका क्लिकवर
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
विशेष म्हणजे विसर्जनाच्या दिवशी मुंबईतील काही पुल देखील बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे हे पुल नेमके कोणते आहेत? हे जाणून घेऊयात.
Mumbai Overbridge Close For Ganpati Visarjan : मुंबई : अनंत चतुदर्शीला अवघे दोन दिवस उरले आहेत. या दिवशी बाप्पाला निरोप देण्यासाठी संपूर्ण मुंबई सज्ज झाली आहे. या विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने मोठी तयारी केली आहे. जेणेकरून गणेश मंडळांची आणि नागरीकांची गैरसोय टाळता येईल. विशेष म्हणजे विसर्जनाच्या दिवशी मुंबईतील काही पुल देखील बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे हे पुल नेमके कोणते आहेत? हे जाणून घेऊयात.
अनंत चतुर्थीच्या दिवशी मुंबई महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. बाप्पांच्या विसर्जनस्थळी जर्मन तराफे, प्रथमोपचार केंद्र, रुग्णवाहिका, क्रेन, नियंत्रण कक्ष, तात्पुरती शौचालये, फ्लड लाईट, सर्च लाईट अशा विविध सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे उप आयुक्त प्रशांत सकपाळ यांनी दिली आहे.
तसेच महापालिकेकडून 245 नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने 129 निरीक्षण मनोरे उभारले आहेत. आणि 42 क्रेनची व्यवस्था तर 287 स्वागत कक्ष तयार करण्यात आले आहे.यासह विसर्जनस्थळी 115 रुग्णवाहिका तर 236 प्रथोमाचार केंद्रही उभारण्यात येणार आहेत.
advertisement
विसर्जनासाठी 298 कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. आणि प्रत्येक नैसर्गिक विसर्जन स्थळी वैद्यकीय कर्मचारी तैनात असणार आहेत. तसेच प्रकाश योजनेसाठी 6 हजार 188 दिवे आणि शोधकार्यासाठी 138 दिवे लावले लावण्यात आले आहेत. यासह 10 हजाराहून अधिक पालिका कर्मचारी विसर्जनासाठी कार्यरत असतील,अशी माहिती प्रशांत सकपाळ यांनी दिली.
मुंबईत एकूण 12 पुलांवर विसर्जन मिरवणूक जाताना काळजी घेण्याच आवाहन करण्यात आले आहेत. कारण या पुलावर प्रत्येकी 16 टन याहून अधिक वजन न टाकण्याचं आवाहन करण्यात आले आहे. विशेष यासाठी पोलिस आणि पालिका कर्मचारी देखील कार्यरत असणार आहेत.
advertisement
विसर्जनाच्या दिवशी 12 पूल बंद असणार
- घाटकोपर रेल्वे पूल (रेल ओव्हर ब्रिज)
- करी रोड रेल्वे पूल (रेल ओव्हर ब्रिज)
- साने गुरुजी मार्ग, ऑर्थर रोड येथील चिंचपोकळी रेल्वे पूल
- भायखळा रेल्वे पूल (रेल ओव्हर ब्रिज)
- मरीन लाईन्स रेल्वे पूल (रेल ओव्हर ब्रिज)
- दादर टिळक रेल्वे पूल, (रेल ओव्हर ब्रिज)
- सँडहर्स्ट रोड रेल्वे पूल (ग्रँट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)
- फ्रेंच रेल्वे पूल (ग्रँट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)
- केनेडी रेल्वे पूल (ग्रँट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)
- फॉकलॅण्ड रेल्वे पूल (ग्रँट रोड व मुंबई सेंट्रलच्या मध्ये)
- महालक्ष्मी स्टेशन रेल्वे पूल
- प्रभादेवी - कॅरोल रेल्वे पूल
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 04, 2025 6:34 PM IST


