Chhatrapati Sambhaji Nagar: कीर्तनकार महिलेच्या हत्येचा अखेर उलगडा, 2 जणांना अटक, धक्कादायक कारण समोर
- Published by:sachin Salve
- Reported by:SIDHARTH GODAM
Last Updated:
वैजापूरमध्ये एका महिला कीर्तनकार महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली होती.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमध्ये एका महिला कीर्तनकार महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. अखेरीस या प्रकरणी पोलिसांनी ४ दिवसांमध्ये छडा लावला आहे. याच परिसरात असलेल्या दोन शेतमजुरांनी या महिलेची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूरमधील एका आश्रमात २७ जून रोजी ह. भ. प. संगीताताई महाराज यांची मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञाताने आश्रमात घुसून हत्या केली होती. आरोपीनं अमानुषपणे त्यांच्या डोक्यावर दगडाने अनेक प्रहार केले. हे वार इतके गंभीर होते की, या हल्ल्यात संगिताताई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या आणि यातच त्यांचा मृत्यू झाला होता. कीर्तनकार महिलेच्या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची च्रक फिरवली आणि अखेरीस मारेकऱ्यांना अटक केली आहे. संतोष चव्हाण आणि अनिल बिलाला अशी आरोपींची नावं आहे.
advertisement
पेटी फोडून सोनं चोरण्याचा होता डाव, पण..
महिला कीर्तनकार ह. भ. प. संगीताताई महाराज यांच्या झालेल्या हत्येचा उलगडा झाला आहे. परिसरातच काम करणाऱ्या संतोष चव्हाण आणि अनिल बिलाला या दोन शेतमजुरांनी त्यांचा खून केला होता. हे दोन्ही शेतमजूर मध्यप्रदेशचे रहिवासी आहे. महिला कीर्तनकार संगिता पवार ज्या घरात राहत होत्या तिथं मंदिराच्या दानपेटीत खूप जास्त सोनं असल्याची दोघांना माहिती मिळाली. त्यामुळे दोघांनी चोरी करण्याचा प्लॅन केला. २७ जूनच्या मध्यरात्री मंदिरात पोहोचले आणि लॉक तोडत असताना आवाज झाला. या आवाजाने महिला कीर्तनकार पवार उठल्या. त्यांनी मंदिर परिसरात पाहणी केली असता दोघे जण दिसले. आपल्या चोरीची वाच्यता कुठे होऊ नये म्हणून चोरांनी पवार यांच्यावर हल्ला केला. या दोघांनी त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला. याबद्दल खुनाची कबुली पोलिसांनी सांगितलं.
advertisement
मध्य प्रदेश सीमेवरून आरोपीला अटक
एक आरोपी महालगाव परिसरात पकडला तर दुसरा आरोपी मध्य प्रदेश सीमेवरून अटक केला. चोरी करून सोने घेऊन पळून जाण्याचा या आरोपींचा प्लान होता. त्यांच्या ताब्यातून काही मुद्देमाल सुद्धा हस्तगत करण्यात आल्याचा पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Location :
Aurangabad Cantonment,Aurangabad,Maharashtra
First Published :
July 02, 2025 7:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chhatrapati Sambhaji Nagar: कीर्तनकार महिलेच्या हत्येचा अखेर उलगडा, 2 जणांना अटक, धक्कादायक कारण समोर