advertisement

Rajya Sabha Election: मविआचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर! ठाकरेंच्या 'डबल गेम'ने कोण होणार घायाळ, कोणाला संधी?

Last Updated:

Maharashtra Politics : आगामी निवडणुकांसाठी शिवसेना (यूबीटी) पक्षाने राज्यसभा आणि विधान परिषद या दोन्ही महत्त्वाच्या जागांवर दावा ठोकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मविआचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर! ठाकरेंच्या 'डबल गेम'ने कोण होणार घायाळ, कोणाला संधी?
मविआचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर! ठाकरेंच्या 'डबल गेम'ने कोण होणार घायाळ, कोणाला संधी?
मुंबई: महाविकास आघाडीमध्ये (मविआ) जागावाटपाचा संघर्ष आता टोकला पोहोचण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांसाठी शिवसेना (यूबीटी) पक्षाने राज्यसभा आणि विधान परिषद या दोन्ही महत्त्वाच्या जागांवर दावा ठोकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या दुहेरी मागणीमुळे मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची (शरद पवार गट) मोठी कोंडी झाली आहे.

दोन्ही जागांवर हक्क का?

शिवसेना ठाकरे नेत्यांच्या मते, महाविकास आघाडीत त्यांचा पक्ष मोठा घटक आहे आणि त्यांची संघटनात्मक ताकद पाहता दोन्ही जागांवर त्यांचा दावा रास्त आहे. खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य करताना म्हटले की, "उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा विधान परिषदेची उमेदवारी घ्यावी, अशी आघाडीतील सर्वच नेत्यांची इच्छा आहे. मात्र, त्याच वेळी राज्यसभेच्या जागेवरही दावा कायम ठेवून ठाकरे गटाने 'बार्गेनिंग पॉवर' वाढवली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
advertisement

ठाकरे गटाला एका जागेवर पाणी सोडावे लागणार?

राजकीय विश्लेषकांच्या मते, शिवसेना (ठाकरे गट) राज्यसभा आणि विधान परिषद या दोन्ही जागा स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करत असली, तरी मित्रपक्षांना सोबत ठेवताना हे सोपे नसेल. जर उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून कायम ठेवायचे असेल, तर त्यांना राज्यसभेची जागा काँग्रेससाठी सोडावी लागू शकते. एकाच वेळी दोन्ही पदे पदरात पाडून घेणे सध्याच्या परिस्थितीत अशक्य वाटत असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले.
advertisement

काँग्रेसचा 'चेकमेट' देण्याचा प्रयत्न

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, उद्धव ठाकरेंनी विधान परिषद लढवावी आणि काँग्रेसला राज्यसभेची जागा द्यावी. मात्र, संजय राऊत यांनी "तिन्ही पक्ष एकत्र बसून ठरवतील" असे म्हणत राज्यसभा सोडण्याचे स्पष्ट संकेत दिलेले नाहीत. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आपले पत्ते अद्याप उघडले नाहीत. शरद पवार यांच्या उमेदवारीवर ठाकरे गट सहमत आहे. तर, काँग्रेसकडून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर साशंकता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसने पवारांच्या उमेदवारीबाबत कोणतेही उघड भाष्य केले नाही.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rajya Sabha Election: मविआचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर! ठाकरेंच्या 'डबल गेम'ने कोण होणार घायाळ, कोणाला संधी?
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement