advertisement

राज्याच्या गावगाड्यावरील प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावणार; मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची पायाला भिंगरी

Last Updated:

महिनाभरापासून सुरू असलेले राजकीय आरोप-प्रत्यारोप, राजकीय पक्षांची एकमेकांवर सुरू असलेली चिखलफेक थांबणार आहे.

Nagar Parishad
Nagar Parishad
मुंबई  : सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीच्या प्रचारामध्ये प्रत्येक पक्षाने आपली कंबर कसली आहे. काही तालुक्यांमध्ये सर्व पक्ष स्वबळावर लढत आहेत तर, काही ठिकाणी युती आणि आघाडी एकत्र लढत आहेत. त्याचदरम्यान, आता सर्वांना एकच प्रश्न पडलाय तो म्हणजे, या निवडणुकीचा प्रचार अंतीम टप्प्यात आला असून सोमवारी (1 डिसेंबरला) प्रचाराच्या तोफा आता थांबणार आहेत.
राज्यात अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने २४६ नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या घोषणेनुसार मतदान 2 डिसेंबरला होणार आहे तर निकाल 3 डिसेंबरला होणार आहे. जाहीर प्रचाराची मुदत ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965’ मधील तरतुदीनुसार 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 पर्यंत असेल. निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचारांच्या तोफा रात्री 10 वाजता थंडावणार आहेत. महिनाभरापासून सुरू असलेले राजकीय आरोप-प्रत्यारोप, राजकीय पक्षांची एकमेकांवर सुरू असलेली चिखलफेक थांबणार आहे.
advertisement

राजकीय वातावरण तापायला सुरुवात

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांस संबंधित कायद्यांमधील तरतुदींनुसार घेतल्या जातात. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसंदर्भातील कायद्यात जाहीर प्रचाराचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार मतदान सुरू होण्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजल्यापासून प्रचार पूर्णपणे बंद होईल. त्यानंतर प्रचारसभा, मोर्चे आणि ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. त्याचबरोबर निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरातींची प्रसिद्धी किंवा प्रसारण करता येणार नाही.  या निवडणुकीतून एकूण 6859 सदस्य आणि 288 नगराध्यक्ष निवडले जाणार असून, राज्यात आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
advertisement

दोन ते तीन वर्षांपासून निवडणुका रखडलेल्या

राज्यातील सर्वच नगर परिषद आणि नगर पंचायतीची विहित मुदत संपुष्टात आली होती. आधी ओबीसी आरक्षण आणि नंतर काही तांत्रिक कारणाने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून निवडणुका रखडलेल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्ग मोकळा झाला असून आता लवकरच नगराध्यक्ष मिळणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राज्याच्या गावगाड्यावरील प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावणार; मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची पायाला भिंगरी
Next Article
advertisement
BMC Shiv Sena Shinde : निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार?  महापौर निवडी आधीच बीएमसीमध्ये उलटफेर
निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार? महापौर निवडी आधी
  • मुंबई महापौर निवडीचा तिढा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला धक्का बसण्याच

  • शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक राजेश सोनावळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

  • सोनावळे यांना अपात्र ठरवून पु्न्हा निवडणूक घेण्याची मागणी करणारी याचिका कोर्टात

View All
advertisement