Nagar Parishad Election: सिंधुदुर्गात पुन्हा निलेश राणे आणि वैभव नाईक यांच्यात राडा, प्रकरण थेट निवडणूक आयोगापर्यंत!
- Published by:Sachin S
Last Updated:
नाईक यांनी यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. निलेश राणे यांना गरजेपेक्षा अतिरिक्त स्वरूपात दिलेली..
सिंधुदुर्ग: राज्यात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली असून आता मैदानातचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यभरात काही ठिकाणी महायुतीमध्ये लढत होत असल्याचं चित्र आहे. अशातच कोकणात सिंधुदुर्गमध्ये नगर परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा राणे विरुद्ध नाईक असा वाद पेटला आहे. आता वैभव नाईक यांनी निलेश राणेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
कोकणात नगरपरिषद निवडणुकीचा आखाडा चांगलाच तापला आहे. अशातच आमदार वैभव नाईक आणि निलेश राणे यांच्यामध्ये वाद पेटला आहे. नाईक यांनी यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. निलेश राणे यांना गरजेपेक्षा अतिरिक्त स्वरूपात दिलेली एस स्कॉर्ड पोलीस संरक्षण कमी करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
"गरज नसतानाही निलेश राणेंना मोठ्या स्वरूपाचे पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणूक आचार संहिता सुरू असून निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निलेश राणे हे वाय आणि एस स्कॉर्ड दर्जाच्या पोलीस संरक्षणाचा वापर बेकायदेशीररित्या मतदारांवर दबाव निर्माण करण्यासाठी करीत आहेत. पोलीस संरक्षणातून क्रेझ निर्माण करून मतदारांवर प्रभाव पाडत आहेत, असा आरोपच नाईक यांनी केला.
advertisement
'निलेश राणेंचा ताफा गेल्यानंतर विनाकारण पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजवले जात असल्याने स्थानिक मतदारांना त्याचा त्रास होत आहे. ग्रामीण भागात अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीची समस्या निर्माण देखील होत आहे, असा आरोपही नाईकांनी केला.
युती न होण्यास रवींद्र चव्हाण जबाबदार-निलेश राणेंचा थेट आरोप
दरम्यान, सिंधुदुर्गात भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद पेटला आहे. 'सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूक ही फक्त शिवसेना विरुद्ध भाजप आहे. असा अर्थ घेऊ नका. या निवडणुकीत सर्वच पक्ष उतरले आहेत. शिंदे यांची शिवसेना पहिल्या दिवसापासून युतीसाठी आग्रही होती. जो युतीचा प्रस्ताव असेल तो स्वीकारण्याची आमची तयारी होती. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युती नको होती, अशी टीकाच निलेश राणे यांनी केली.
advertisement
तसंच, सगळ्या जागा जिंकण्यासाठीच आम्ही युती मागत होतो. राणे साहेब सुद्धा युतीसाठी आग्रही होते. मात्र प्रदेशाध्यक्षांचा युतीला विरोध होता. रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष असून सुद्धा ते तीन तीन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात का थांबत होते. यापूर्वीचे प्रदेशाध्यक्ष हे कधी एका दोन जिल्ह्याचे वाटले नाहीत. ते महाराष्ट्राचे वाटले. दोन-तीन जिल्ह्यांचे नेतृत्व प्रदेशाध्यक्षांकडून होतंय असं दिसतं, अशी टीकाही त्यांनी केली.
advertisement
"युती व्हायला हवी या मताचा मी सुद्धा आहे आणि राणे साहेब सुद्धा याच मताचे होते. कणकवलीत एक सीट सुद्धा घ्यायला आम्ही तयार होतो. आमचे कणकवलीतील बॅनर वरील फोटो भाजपने काढले. माझा फोटो काढला ठीक होतं. पण एकनाथ शिंदे यांचा सुद्धा फोटो काढला आणि हे सगळं युतीची चर्चा होत असताना घडलं, अशी टीकाही राणेंनी केली.
view commentsLocation :
Sindhudurg,Maharashtra
First Published :
November 21, 2025 9:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagar Parishad Election: सिंधुदुर्गात पुन्हा निलेश राणे आणि वैभव नाईक यांच्यात राडा, प्रकरण थेट निवडणूक आयोगापर्यंत!


