advertisement

सणासुदीच्या काळात प्रवाशांसाठी स्पेशल ट्रेन, कुठून- कुठे रेल्वे धावणार? जाणून घ्या वेळापत्रक

Last Updated:

मध्य रेल्वेने दिवाळी आणि छट पूजेसाठी मुंबईहून वेगवेगळ्या भागासाठी स्पेशल रेल्वे सुरू केली आहे. नागरिकांची विविध मार्गावर वाढलेली प्रचंड गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने विविध विभागात वेगवेगळ्या मार्गावर स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

News18
News18
सध्या सणासुदीचे दिवस आहेत. या सणासुदीच्या दिवसानिमित्त रेल्वेने प्रवाशांसाठी विशेष रेल्वे सुरू केली आहे. अलीकडेच दिवाळी साजरी करण्यात आली, आता अवघ्या काही दिवसांवर छट पूजेचा सण आहे. दिवाळी आणि छट पूजानिमित्त अनेक नोकरदारवर्ग आपल्या गावी सण साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जात असतात.
मध्य रेल्वेने दिवाळी आणि छट पूजेसाठी मुंबईहून वेगवेगळ्या भागासाठी स्पेशल रेल्वे सुरू केली आहे. नागरिकांची विविध मार्गावर वाढलेली प्रचंड गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने विविध विभागात वेगवेगळ्या मार्गावर स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, आज २४ ऑक्टोबरला नागपूर ते मुंबई आणि पुणे- हडपसर ते नागपूर स्पेशल ट्रेन धावणार आहेत.
advertisement
मध्य रेल्वेने सणासुदीनिमत्त मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर या मार्गावर रेल्वे धावणार आहे. विशेष गाडी क्र. 01005 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 25 ऑक्टोबरला मध्यरात्री 12:20 वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी दुपारी 03:30 वाजता पोहोचेल. तर, विशेष गाडी क्र. 01006 नागपूर येथून 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 06:10 वाजता सुटेल आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 08:25 वाजता पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगांव, भुसावल, मलकापुर, शेगांव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगांव आणि वर्धा येथे थांबा राहील. 20 तृतीय वातानुकूलित आणि दोन जनरेटर व्हॅन अशी गाडीची संरचना राहील, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले.
advertisement
विशेष गाडी क्र. 02140 नागपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी नागपूर स्थानकावरून शुक्रवारी दुपारी 01:30 वाजता सुटेल. वर्धा, धामनगाव, बडनेरा, मुर्तीजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपूरी, कल्याण आणि ठाणे आदी ठिकाणी या गाडीचे थांबे राहणार आहे. या गाडीला तीन थर्ड एसी, 10 स्लिपर, 5 सेकंड जनरल आणि 2 सेकंड जनरल कोचसह गार्ड ब्रेक व्हॅन राहणार आहे.
advertisement
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर सोबतच नागपूर- हडपसर मार्गावरही रेल्वे चालवली जात आहे. प्रवाशांच्या  सोयीसाठी विशेष गाडी क्र. 01202 हडपसर- नागपूर ही स्पेशल ट्रेन हडपसर स्थानकावरून शुक्रवारी दुपारी 03:50 वाजता सुटणार आहे. ही रेल्वे उरळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा रेल्वे स्थानकावर थांबेल. या गाडीला चार थर्ड एसी, 6 स्लिपर, 6 जनरल सेकंड आणि 2 जनरल सेकंड कोचसह गार्ड ब्रेक व्हॅन राहणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सणासुदीच्या काळात प्रवाशांसाठी स्पेशल ट्रेन, कुठून- कुठे रेल्वे धावणार? जाणून घ्या वेळापत्रक
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement